कऱ्हा-केळी व्यवसायावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:22+5:302021-05-11T04:14:22+5:30
अक्षय तृतीया सणाला कुंभार व्यावसायिक घरोघरी जाऊन मातीच्या केळी आणि कऱ्हा विकत असतात. यंदा मात्र कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात ...
अक्षय तृतीया सणाला कुंभार व्यावसायिक घरोघरी जाऊन मातीच्या केळी आणि कऱ्हा विकत असतात. यंदा मात्र कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने प्रशासनाने सर्व प्रकारचे आठवडा बाजार देखील बंद केले आहेत. त्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण असल्याने घरोघरी जाऊन केळी आणि कऱ्हा विकणे कुंभार व्यावसायिकांना दुरापास्त होणार असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडूनही यंदा केळी आणि कऱ्हा यासाठी मागणी नसल्याने तयार करून ठेवलेल्या केळी आणि कऱ्हा तशाच पडून राहणार असल्याची भीती कुंभार व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप, देशमाने, पाटोदासारख्या गावात मोठ्या प्रमाणात केळी-कऱ्हा तसेच मातीची भांडी, रांजण आदी साहित्य खरेदी करण्यासाठी आवर्जून येत असतात.
इन्फो
प्रतिनग ३० ते ४० रुपये दर
‘करा’ हा हयात नसलेल्या वडील किंवा आजोबांच्या नावाने पूजा करण्यात येत असते. तर ‘केळी’ ही हयात नसलेल्या आई किंवा आजीच्या नावाने पूजा करण्यात येत असते. ही मातीची करा - केळी तयार करण्यासाठी योग्य प्रकारची चिगटी करून माती, पोयटा,काळी राख, भुसा असे दुर्मीळ साहित्य लागते. कऱ्हा-केळी तयार झाल्यानंतर कुंभार बांधव ग्रामीण भागातील प्रत्येक घरोघरी जाऊन ३० ते ४० रुपये नगाप्रमाणे विक्री करत असतात. परंतु सध्या मागणी कमी प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोट.....
मी नोकरीच्या शोधात अनेक वर्षे वाया घातली. मात्र, कुठेच नोकरी मिळाली नाही. त्यामुळे मी माझ्या पूर्वजांचा सुरू असलेला कुंभार व्यवसाय करण्यास सुरुवात केली असून त्यात दोन वर्षांपासून कोरोना असल्याने तयार केलेल्या मालाला मागणी कमी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च वाया जात असून मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडलो आहे.
दिलीप रसाळ, कुंभार व्यावसायिक, पिंपळगाव लेप.
फोटो : १० कराकेळी-१
पिंपळगाव लेप येथे अक्षय तृतीया सणासाठी मातीच्या केळी-कऱ्हा तयार करताना कुंभार व्यावसायिक.
===Photopath===
100521\10nsk_15_10052021_13.jpg
===Caption===
फोटो : १० कराकेळी-१ पिंपळगाव लेप येथे अक्षयतृतीया सणासाठी मातीच्या केळी कऱ्हा तयार करताना कुंभार व्यावसायिक.