पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:14 PM2020-08-10T23:14:19+5:302020-08-11T01:24:15+5:30

जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे पारावरच्या गप्पा पूर्णपणे बंद पडल्या असून, सर्वत्रच पार ओस पडलेले दिसत आहेत.

Corona's eclipse of the chatter on the mercury | पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण

पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव निंबायती : ग्रामीण भागात नागरिकांकडूनच सतर्कता

अमोल अहिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे पारावरच्या गप्पा पूर्णपणे बंद पडल्या असून, सर्वत्रच पार ओस पडलेले दिसत आहेत.
पार म्हणजे काय हे आता नव्याने सांगायला नको. मात्र युवा पिढीला विशेषत: शहरी भागातील तरुणाईला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात देशातील बहुधा सर्वच भागात पूर्वापारपासून प्रचलित असलेली ही ह्यपारह्ण संस्कृतीची माहिती अथवा अनुभव फारसा नसावा. मात्र अनेक गावं तसेच शहरामध्ये असलेले पार, ओटा आजही अनेक ऐतिहासिक घटनांचे प्रत्यक्ष मूक साक्षीदार आहेत. प्रत्येक गावात जुन्या पिंपळाच्या, कडुलिंबाच्या किंवा वडाच्या झाडाभोवती जो मोठा ओटा असतो तो म्हणजेच गप्पांचा एक कट्टा किंवा अड्डा. अनेक गावात झाडाभोवती असे पार बनवलेले आहेत. विसावा घेण्यासाठी तसेच गप्पांसाठी त्यांचा उपयोग होतो. ज्या पारावर घरातल्या राजकारणापासून ते थेट देशातल्या राजकारणापर्यंत थोडक्यात गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात तो कट्टा म्हणजे पार. या गप्पा अगदी अघळपघळ असतात.
पूर्वी याच पारावर गावाचा न्यायनिवाडादेखील होत असे. अनेकांना या पारावरून न्याय मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. पारावर बसूनच पूर्वीच्या काळी गावातील आपापसातील तंटे सरपंच व पंचमंडळी सामोपचाराने मिटवत होते. पारावरच चावडी भरायची. पूर्वी छोट्या खेडेगावामध्ये पारावरच गावातील शाळाही भरत असे. स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील या पारांना मोठे महत्त्व होते. अनेक महत्त्वपूर्ण घटना या पारावर बसूनच ठरत असायच्या. कधीकाळी हे पार सभेचे व्यासपीठ झालेले आपणास पहावयास मिळते. गावातल्या पोरांनी अनेक दिग्गजांची भाषणे या पाराभोवती बसून ऐकले आहेत. जसे गावात पार आहेत. त्याप्रमाणे शहरातदेखील या पारांना मोठा इतिहास आहे. शहरातील जुन्या भागामध्ये आजही अनेक पार इतिहासाची साक्ष देत तिथे टिकून आहेत. नाशकातील भद्रकाली परिसरातील ह्यपिंपळपारह्ण हे त्याचे उदाहरण आहे.पूर्वीच्या काळी घरात टीव्ही नव्हते. त्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत लोक पारावर बसून मनसोक्त गप्पा मारत असत. आज घरोघरी टीव्ही आल्यामुळे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आल्यामुळे पारावरच्या गप्पा फारच कमी झाल्या असल्या तरी, पूर्णपणे मात्र बंद झालेल्या नाहीत. कोणीतरी एखादा दुपारच्या वेळी पाराच्या कडेवर पाय सोडून निवांत बसलेला आपल्याला हमखास दिसायचा, मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने पार पूर्णपणे निर्मनुष्य झाले आहेत.

Web Title: Corona's eclipse of the chatter on the mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.