पीळ बसला, वेदना आता असह्य झाल्या’ कवितेद्वारे मांडली कोरोनाची वस्तुस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:46 PM2020-06-12T22:46:23+5:302020-06-13T00:07:51+5:30

नांदगाव : पावसाच्या कवितांमध्ये कवींची अनोखी व्हॉट्सअ‍ॅप मैफल न्हाऊन निघाली. सगळीकडे कोरोनाच्याच बातम्यांमुळे आंबून गेलेल्या कवींनी जरा कुछ अलग सोचते है असे म्हणत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगावतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

Corona's fact is presented through the poem 'Twisted, the pain is now unbearable' | पीळ बसला, वेदना आता असह्य झाल्या’ कवितेद्वारे मांडली कोरोनाची वस्तुस्थिती

पीळ बसला, वेदना आता असह्य झाल्या’ कवितेद्वारे मांडली कोरोनाची वस्तुस्थिती

Next

नांदगाव : पावसाच्या कवितांमध्ये कवींची अनोखी व्हॉट्सअ‍ॅप मैफल न्हाऊन निघाली. सगळीकडे कोरोनाच्याच बातम्यांमुळे आंबून गेलेल्या कवींनी जरा कुछ अलग सोचते है असे म्हणत येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नांदगावतर्फे कविसंमेलन आयोजित करण्यात
आले होते. त्याला नांदगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग असल्याचा दावा प्रा. सुरेश नारायणे, कार्यवाह कवी काशीनाथ गवळी यांनी केला.
‘बायकोच्या निधनाने झालो पोरका, मुलाच्या घरात झाला तो पाहुणा’ या कवितेतून त्यांनी वास्तव मांडले, तर प्रतिभा खैरनार या नवकवयित्रीने ‘आजचा काळजाला ही पीळ बसला वेदना आता असह्य झाल्या, देवळातला देव ही रुसला’ या कवितेतून कोरोनाची वस्तुस्थिती मांडली.
अ‍ॅड. सचिन साळवे, डॉ. मधुकर कवडे, रमेश घोडके, अलका शिंदे, विक्रम घुगे, अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर भावना व्यक्त केल्या. किरण मोरे यांनी आभार मानले.
-----------------------------
कोरोना काळात आनंद प्राप्तीसाठी कार्यक्रम
कोरोनाच्या काळात सदस्यांना आनंद मिळावा यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. रवींद्र कांबळे यांनी ‘माय’ ही कविता सादर करताना ‘मायच्या डोळ्यात जेव्हा अश्रू होऊन दाटायचा.. खरंच सांगतो तेव्हा पाऊस नकोसा वाटायचा’ या ओळी परिस्थितीची जाणीव करून गेल्या. विद्या देवरे (माळी) यांनी ‘शब्दांच्या गर्भात’ तर प्रा. सुरेश नारायणे यांनी ‘पोरका’ ही कविता सादर केली.

Web Title: Corona's fact is presented through the poem 'Twisted, the pain is now unbearable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक