अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 08:41 PM2020-04-22T20:41:14+5:302020-04-23T00:22:28+5:30
येवला : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या हंगामात जे कमाऊ त्यावरच वर्षभराची गुजराण करणारा कुंभार व्यवसायिक यंदा कोरोना महामारीच्या फेऱ्याने अडचणीत सापडला आहे.
येवला : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या हंगामात जे कमाऊ त्यावरच वर्षभराची गुजराण करणारा कुंभार व्यवसायिक यंदा कोरोना महामारीच्या फेऱ्याने अडचणीत सापडला आहे. अक्षय्य तृतीयेला नवी करा-केळी पूजेसाठी घरोघर लागते. मात्र कोरोनाने बाजारपेठा, गावोगावचे बाजार बंद झाल्याने यंदाची अक्षय्य तृतीया करा-केळीशिवाय साजरी होणार असल्याचे चित्र आहे. येवला तालुक्यात कुसमाडी, पिंपळगाव लेप, मुखेड, चिचोंडी, देशमाने, विखरणी, राजापूर, ममदापुर, सावरगाव, पाटोदा, मुरमी, एरंडगाव, नगरसूल, सायगाव, अंदरसूल, देवळाणे बोकटे, जऊळके, भिंगारे, सोमठाण देश, नागडे, भारम आदी गावातील कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय मातीची खापर, कोळमे, चूल, गाडगी, मडकी, माठ, रांजण, करा-केळी, बोळकी आदी वस्तू तयार करणे हा आहे. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाºया पैशातूनच या व्यवसायिकांच्या कुटुंबाचा उदरिनर्वाह होतो. उन्हाळ्यामध्ये तसेच विवाह सोहळ्यानिमित्ताने माठ, रांजण, चूल यांची मोठी मागणी असते. जानेवारी ते मे असा पाच महिने पैसे कमावण्याचा हंगाम. या हंगामातील उत्पन्नावरच कुंभार व्यावसायिकांचे वर्षभराचे आर्थिक गणित
जुळते.
----------
यंदा हंगामाच्या काळातच कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन, संचारबंदी लागू झाली. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांचे वर्षाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने कुंभार समाजाला अर्थसाहाय्य करण्याची गरज आहे.
- दादासाहेब शिरसाट
कुंभार व्यावसायिक