दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:50 PM2020-07-01T12:50:06+5:302020-07-01T12:56:24+5:30

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Corona's first victim in the city police force | दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त

दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देदोघांवर उपचार सुरूशहरात कोरोनाचा धोका वाढला

नाशिक : आरोग्य प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाच्या संक्रमणकाळात योध्दांच्या भूमिकेत पोलीस दल कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील ग्रामिण पोलीस दलानंतर शहर पोलीस दलातसुध्दा काही दिवसांपुर्वी कोरोनाचा शिरकाव झाला. बुधवारी (दि.१) मुंबई येथे रूग्णालयात दाखल असलेल्या एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने बळी घेतला. पोलीस आयुक्तालयातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला असून संपुर्ण आयुक्तालयावर शोककळा पसरली आहे.

नाशिक ग्रामिण पोलीस दलातील तीघा कर्मचाऱ्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली तर शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारदेखील मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी शहरात येताच इंदिरानगरसह संपुर्ण पोलीस आयुक्तालयावर शोककळा पसरली असून पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक शहर पोलीस दलाने त्यांच्या रूपाने एक कोरोना योध्दा गमावल्याची भावना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केली.
शहर पोलीस दलातील एकूण ८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी पाच कोरोनामुक्त झाले तर दोघे अद्याप रूग्णालयांत उपचारार्थ दाखल असून ते परिमंडळ-१मधील पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत. परिमंडळ-२मधील पोलीस ठाण्यातील कर्मचाारी आता कोरोनामुक्त झाले आहेत. मयत झालेल्या पोलीस हवालदारांच्या वारसदारांना शासन नियमानुसार सर्वोतोपरी अर्थसहाय्य केले जाणार आहे. कोरोना संक्रमण काळात कर्तव्य बजावताना पोलीसाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून यापुर्वीच घेण्यात आला आहे.


 

Web Title: Corona's first victim in the city police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.