उपाययोजना सुरू : देवळाली कॅम्पमध्ये कोरोनाचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 09:14 PM2020-06-20T21:14:01+5:302020-06-20T21:14:36+5:30
देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
देवळाली कॅम्प : परिसरातील मिठाई स्ट्रीट भागातील एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तसेच शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाठविलेल्या ३२ नमुन्यांपैकी १० नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. छावणी परिषदेकडून तात्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनिटायझेशनची मोहीम हाती घेण्यात आली.
देवळाली कॅम्प परिसरात दोन महिन्यांपुर्वी लष्करातील मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी काम करणाºया इसमाला कोरोनाची लागण झाल्यानंतर छावणी परिषद प्रशासन व पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून संबंधित परिसर सील केला होता. उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर जे.एस.गोराया, उपाध्यक्ष भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी आरोग्य अधिकार्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचार्यांना सूचना दिल्या होत्या. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होत केले गेल्याने देवळाली कॅम्प भागात कोरोनाचे संक्रमण रोखण्यास छावणी परिषदेला यश आले होते. मात्र चौथे लॉकडाऊन संपताच लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आणि अनलॉकची घोषणाही झाल्याने पुन्हा देवळाली कॅम्पमध्ये नागरिकांची वर्दळ सुरू झाली.आणि अद्याप आठ करोना बाधित रु ग्ण आढळून आले आहे. लगतच्या भगूर, लहवीत, राहुरी, शेवगेदारणा, नानेगाव येथे ही कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. मिठाई स्ट्रीट येथे राहणार्या ६५ वर्षीय महिला मृत्यूमुखी पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.