विंचूर शहरात कोरोनाचा पहिला बळी; प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:55 PM2020-06-26T22:55:04+5:302020-06-27T01:35:07+5:30
विंचूर : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या येथील रुग्णाचा नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विंचूर व परिसरात पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रेल्वे खात्यात सेवेत असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या व येथील रहिवासी असलेल्या ४४वर्षीय इसमाची गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यास मंगळवारी (दि. २३) विंचूर येथे उपचारासाठी आणण्यात आले होते.

या रुग्णास येथील एका खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले असता या डॉक्टरांनी दुरूनच रु ग्णाची चौकशी केली असता त्यांना रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यास नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचे नमुने दि. २४ रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल काल दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सदर रुग्णाच्या पश्चात आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. यापैकी भाऊवगळता कुटुंबातील इतर सदस्यांना पिंपळगाव येथे क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
खबरदारी म्हणून विंचूर ग्रामपालिकेच्या वतीने रु ग्णाच्या घराजवळील १०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी (दि.२६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मृत कोरोना रु ग्ण हा विंचूर येथील रहिवासी होता. परंतु सध्या कल्याण येथे वास्तव्यास होता. त्यामुळे कोरोना बाधा झाल्याच्या कालावधीत या रु ग्णाचा विंचूरमध्ये कोणाशीही जवळून संपर्क आलेला नाही़ फक्त योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, विंचूर वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. जाधव यांनी केले.