शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात नवे ७५ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:59 PM2020-06-19T22:59:30+5:302020-06-19T23:02:47+5:30

शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता एकूण १ हजार ५२ इतका झाला आहे. अद्याप एकूण ५१ रूग्णांचा बळी शहरात गेला आहे.

Corona's havoc continues in the city; 75 new corona bites throughout the day | शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात नवे ७५ कोरोनाबाधित

शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात नवे ७५ कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्दे४२० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले ५८१ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे वाढते थैमान

नाशिक : शहर व परिसरात कोरोना विषाणूचा फैलाव अत्यंत वेगाने होऊ लागला आहे. यामुळे नाशिककरांनी अधिक सतर्क होऊन स्वत:ला गर्दीपासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. शुक्रवारी (दि.१९) रात्री दहा वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालय व महापालिका आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालांनुसार शहरात नवे ७५ कोरोेनाबाधित आढळून आले. तसेच उपचारार्थ दाखल असलेल्या वडाळारोडवरील तीन कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यूही झाला. यामध्ये दोन वृध्द तर एक ३८ वर्षीय तरूण आहे. शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता एकूण १ हजार ५२ इतका झाला आहे. अद्याप एकूण ५१ रूग्णांचा बळी शहरात गेला आहे. ४२० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत तर ५८१ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत.

लॉकडाऊन शिथिल होताच महापालिका हद्दीतील विविध उपनगरीय भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले. गुरूवारी कोरोनाबाधितांचा आकडा थेट शंभरीपार म्हणजेच ११६ इतका झाला होता. यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनालादेखील धक्का बसला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असुनही या आजाराचे संक्रमण थांबता थांबत नसल्याने आश्चर्य अन् चिंताही व्यक्त होत आहे. नाशिक महापालिका हद्दीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा शुक्रवारी एक हजाराच्या पुढे सरकला. गुरूवारी रात्रीपर्यंत शहराचा अतापर्र्यंतचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९७७ इतका होता तर शुक्रवारी थेट १ हजार ५२ झाला. 
शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे वाढते थैमान हा मनपा आरोग्य प्रशासनाचा मोठा चिंतेचा विषय बनत चालला आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे? हा यक्ष प्रश्न झाला आहे. सातत्याने पंचवटी, जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत रूग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी तर वडाळागावातसुध्दा पुन्हा दोन रूग्ण मिळून आले. एकूणच दाट वस्तीत कोरोनाचा झालेला शिरकाव हीच मोठी घातक समस्या बनली आहे.

परिसरनिहाय आढळून आलेले कोरोनाग्रस्त रूग्ण असे
पेठरोडवरील वैशालीनगर-१५, भराडवाडी-१, म्हसरूळ-१, बोरगड-२, एकतानगर (म्हसरूळ)-१, सुखसागर अपार्टमेंट (पेठरोड)-१, हनुमानवाडी-१, मेरी कॉलनी-१, रामवाडी-१, त्रिमुर्ती चौक (दिंडोरीरोड)-१, जुने नाशिक-१ फकिरवाडी-१, दुधबाजार-१, काजीपुरा-२, चौकमंडई-१, नानावली-१, सारडासर्कल-१, गंजमाळ-१, श्रमिकनगर (गंजमाळ)-६, सहकारनगर (गंजमाळ)-२, काठेगल्ली-१, पखालरोड-१, गुलशन कॉलनी-१, भाभानगर-१, विनयनगर-१, इंदिरानगर-२, महेबुबनगर (वडाळा)-१, वडाळागाव-१, माणेकशानगर-१, टाकळीरोड-१, मातोश्रीनगर ( उपनगर)-३, आनंदनगर (उपनगर)-२, जयभवानीरोड-१, स्टेशनवाडी-४, सातपूर भाजीमार्केट-१, संकेत अपार्टमेंट-१, औरंगाबादरोड-१, महाराणाप्रताप चौक (सिडको)-१, त्रिमुर्ती चौक (सिडको)-१, अंबड-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात अद्याप १५४ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत.


 

Web Title: Corona's havoc continues in the city; 75 new corona bites throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.