...यंदाही वन्यप्राणी गणनेला कोरोनाची ‘बाधा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:50+5:302021-05-24T04:13:50+5:30

----- नाशिक : वन-वन्यजीव विभागाच्या वतीने दरवर्षी चांदण्या रात्रीचे औचित्य साधत बुद्धपौर्णिमेला राखीव वनक्षेत्र, अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणना केली जाते; ...

... Corona's 'obstacle' to wildlife census again this year | ...यंदाही वन्यप्राणी गणनेला कोरोनाची ‘बाधा’

...यंदाही वन्यप्राणी गणनेला कोरोनाची ‘बाधा’

googlenewsNext

-----

नाशिक : वन-वन्यजीव विभागाच्या वतीने दरवर्षी चांदण्या रात्रीचे औचित्य साधत बुद्धपौर्णिमेला राखीव वनक्षेत्र, अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणना केली जाते; मात्र यावर्षीही वन्यप्राण्यांच्या मोजदाद करण्याचा हा ‘मुहूर्त’ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हुकणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. येत्या १ तारखेपर्यंत निर्बंधांमध्ये कुठलीही शिथिलता येण्याची चिन्हे नाहीत. यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही वन्यजीवांची गणना करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार नसल्याचे नाशिक वन्यजीव विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चांदण्या रात्रीच्या प्रकाशात जंगल उजळून निघालेले असते. त्याचाच फायदा घेत रात्री वन-वन्यजीव विभागाकडून कर्मचारी तसेच विविध वन्यजीवप्रेमी संस्थांच्याच्या मदतीने विविध पाणवठ्यांवर आपली तृष्णा भागविण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यासाठी बुद्धपौर्णिमा जवळ येताच लगबग पाहावयास मिळते. विविध राखीव वने, अभयरण्यांमध्ये पाणवठ्यापासून जवळच नैसर्गिकरित्या रचना भासेल अशा मचाण उभारल्या जातात. निरीक्षण मनोऱ्यांची दुरुस्ती करण्यात येते. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या कारणामुळे हे सर्व ठप्प झाले आहेत.

बहुतांश अभ्यारण्यांमध्ये निरीक्षण मनोऱ्यांची दुर्दशा झाली आहेत. पाणवठ्याची अवस्था फारशी चांगली आहे, असे नाही. काही पाणवठे तर मातीआड झाली आहेत. वन्यप्राण्यांची गणना न करण्यामागे एकूणच कोरोनाचे कारण वन-वन्यजीव विभागाकडून पुढे केले जात असले तरीही निदान काही ट्रॅप कॅमेरे, उपलब्ध अपुऱ्या मनुष्यबळाच्या मदतीने श्यक्य तितक्या प्रमाणात वन-वन्यजीव विभागांतर्गत या चांदण्या रात्रीच्या संधी न दवडू देता वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. तरच नाशिक विभागातील वन्यप्राण्यांची माहिती आणि त्यांचा अधिवास कितपत सुरक्षित राहिला आहे, हे समोर येईल, असे वन्यप्राणी प्रेमी स्वयंसेवी संघटनांचे म्हणणे आहे.

----इन्फो---

नाशिक वनवृत्तातील अभयारण्य असे...

रामसर दर्जाचे नांदूरमध्यमेश्वर (नाशिक)

कळसुबाई-हरिश्चंद्रगड (अहमदनगर)

यावल अभयारण्य (जळगाव)

अनेर डॅम ( शिरपूर, धुळे)

----इन्फो----

नाशिकमधील प्रमुख राखीव संवर्धन वने

पांडवलेणी वन

अंजनेरी (नाशिक-त्र्यंबकेश्वर रोड)

बोरगड (दिंडोरी रोड)

राजापूर-ममदापूर काळवीट संवर्धन क्षेत्र

----कोट---

कोरोनाची दुसरी लाट, राज्य शासनाचे निर्बंध यामुळे अभ्यारण्यांमध्ये यावर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करणे श्यक्य होणार नाही. अपुरे मनुष्यबळ आणि आवश्यक साधनांमुळे वन-वन्यजीव विभागाच्या स्तरावरसुद्धा गणना यशस्वी होऊ शकणार नाही, कारण पाणवठ्यांची संख्या लक्षात घेता मनुष्यबळ खूपच कमी पडेल. मात्र नियमितपणे गस्त आणि निरीक्षण करण्याचे आदेश सर्व वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहेत.

- अनिल अंजनकर, वनसंरक्षक, वन्यजीव नाशिक वनवृत्त

-

फोटो : संग्रहित : nsk वर पाठविले आहे.

Web Title: ... Corona's 'obstacle' to wildlife census again this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.