सिन्नरला रॅपिड टेस्टमुळे दोन तासात कोरोनाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:12 PM2020-07-24T22:12:47+5:302020-07-25T01:12:10+5:30
सिन्नर : उपजिल्हा रुग्णालयाने ३०० रॅपिड अॅँटिजेन टेस्ट किटची मागणी सरकारकडे केली होती. या किट तीन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याने आता कोरोना तपासणीचे अहवाल अवघ्या दोन ते तीन तासात मिळू लागले आहेत.
सिन्नर : उपजिल्हा रुग्णालयाने ३०० रॅपिड अॅँटिजेन टेस्ट किटची मागणी सरकारकडे केली होती. या किट तीन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याने आता कोरोना तपासणीचे अहवाल अवघ्या दोन ते तीन तासात मिळू लागले आहेत.
शहर आणि तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने त्यांचे हायरिस्क आणि लो-रिस्क कॉन्टॅक्ट संशयितांची संख्याही वाढू लागल्याने आरोग्य विभागावर प्रचंड ताण पडू लागला आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगनंतर संशयितांचे स्वॅब घेणे, रिपोर्ट पाठविणे यात कमालीचा वेळ जातो. शिवाय पाठविलेल्या स्वॅबचे अहवाल येण्यासही दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा भार वाढण्यासोबतच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत होते. याशिवाय संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत दोन-तीन दिवस ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात तसेच इंडिया बुल्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे लागते. परिणामी बाधित रुग्ण आणि संशयितांची संख्या वाढत असल्याने बेड कमी पडत आहेत. याशिवाय शहर तसेच तालुक्यातही संभ्रमाचे वातावरण पसरते. बाधित रुग्णांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट संशयिताना दाखल केल्यानंतर त्यांच्या तपासणीचा अहवाल झटपट प्राप्त व्हावा यासाठी आरोग्य विभागाने शासनाकडे रॅपिड अॅँटिजन टेस्ट किटची मागणी केली होती. संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने आरोग्य विभागास ३०० किट उपलब्ध करून दिले.
यापैकी दोन दिवसात 192 जणांची तपासणी करण्यात आली असून 38 पॉझिटिव्ह आले.आरोग्य विभागाने आणखी 500 किटची मागणी केली आहे.