ग्रामीण भागात वाढतोेय कोरोनाचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:17 PM2020-07-15T21:17:38+5:302020-07-16T00:14:40+5:30
मालेगाव : शहरात कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे ठाकले आहे. मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०५ रुग्ण बाधित आढळले. त्यातील काही बव्हंशी रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ग्रामीण भागात १६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
मालेगाव : शहरात कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे ठाकले आहे. मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०५ रुग्ण बाधित आढळले. त्यातील काही बव्हंशी रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ग्रामीण भागात १६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
मालेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दि. २ मे रोजी दाभाडी येथे आढळून आला होता. त्यापूर्वी शहरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना ग्रामीण भागात पुरेशी दक्षता घेण्यात येत होती मात्र शहरापासून अवघ्या दहा कि.मी. अंतरावर वर असलेल्या दाभाडीत कोरोनाने प्रवेश केला आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. मालेगावातून दाभाडीत ये-जा करणाऱ्या डॉक्टरांमुळे गावात काही जण बाधित झाले. मात्र काही दिवसातच गाव कोरोनामुक्त झाले होते. नंतर पुन्हा रुग्ण आढळून आल्याने गावात दहशत पसरली होती. मालेगाव तालुक्यात आतापर्यंत १०५ बाधित रुग्ण आढळून आले असून, ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील ८३ रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
-----------
दाभाडी-झोडगेत केंद्र
झोडगे आणि दाभाडी येथे उपचार केंद्र असून, ज्या रुग्णांना आॅक्सिजनची गरज असेल त्यांना झोडगे येथे पाठविण्यात येते. गंभीर असल्यास फारहान रुग्णालयात दखल केले जाते. सध्या दाभाडीत सात बाधित रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हायरिस्कचे ३३ रुग्ण आहेत. मालेगाव तालुक्यात सध्या १६ बाधित रुग्ण असून, त्यात दाभाडीत ७, झोडगे ग्रामीण रुग्णालयात ४ आणि जळगाव गाळणेचा एक, खाकुर्डीतील एक, अजंगचे दोन जण आणि पाटणे येथील एक असे ५ जण उपचार घेत आहेत.
-----------
३४ कंटेन्मेंट झोन
संशयितांसाठी दाभाडीत आयसोलेशन वॉर्ड आहे. तेथे रुग्णाचा अहवाल येईपर्यंत निगराणीखाली ठेवण्यात येते. दाभाडीत एक वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नियुक्त करण्यात आली असून, रात्री एक डॉक्टर आणि आरोग्यसेवक यांची नेमणूक असते. तालुक्यात आतापर्यंत एक हजार ४७४ जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे तर १६ हजार ५१८ संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे.तालुक्यात ४० कंटेन्मेंट झोन होते. त्यांची कालमर्यादा संपली आहे. सध्या ३४ अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन आहेत.
--------------
तालुक्यात २५८ आशा वर्करमार्फत १४१ गावांमध्ये ६० वर्षांवरील रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. याशिवाय कॅन्सर, उच्च रक्तदाब, किडनी, जुनाट आजाराचे रुग्ण यांचीदेखील पाहणी केली जात आहे. त्यांचे स्क्रीनिंग केले जात आहे. तालुक्यात मृत्यूचे प्रमाण घटले असून, सर्वेक्षणात रुग्ण संशयित वाटल्यास डॉक्टरांकडे पाठवून तपासणी केली जात आहे.
- डॉ. शैलेशकुमार निकम,
तालुका वैद्यकीय अधिकारी