कोरोनाच्या सुपर स्प्रेडरवर पायबंद घालणे जरुरीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:14 AM2021-04-21T04:14:26+5:302021-04-21T04:14:26+5:30
दुसऱ्या लाटेत स्प्रेडिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांना पटकन लागण होत आहे. एका रुग्णामागे तीन रुग्ण किंवा संपूर्ण घरातील ...
दुसऱ्या लाटेत स्प्रेडिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. लोकांना पटकन लागण होत आहे. एका रुग्णामागे तीन रुग्ण किंवा संपूर्ण घरातील सदस्य बाधित होत आहेत. पॉझिटिव्ह आलेला रुग्ण मोकळा फिरतो. त्याने १४ दिवस विलग राहावे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. लसीचा साठा वेळेवर मिळण्याची गरज आहे. ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी कमी पडत आहे. लोकांनी काम नसताना फिरणे बंद केले पाहिजे. लग्न, साखरपुडा, अंत्यविधीला लोक जातात. कोविड हॉस्पिटलमध्येही लोक विनाकारण फिरायला येतात. आम्ही जीवावर उदार होऊन काम करतो. कार्यकर्ते रुग्णालयात येऊन आमचे नातेवाईक अॅडमिट असल्याचे सांगून स्वत: सुपर स्प्रेडर होत आहेत. रुग्णालयात येऊन कामात हस्तक्षेप करतात. अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत.
इन्फो
नागरिकांनी वेळच्या वेळी हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझर वापरावे, सामाजिक अंतर पाळावे, मास्क वापरणे गरजेचे आहे. त्रिसूत्रीचा वापर केल्यास कोरोनापासून बचाव करता येईल. घरातील वयस्कर माणसांना बाजूला खोलीत ठेवा. घरात कोणाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर अशा व्यक्तीला विलग करा. दिवसात तीन-चार वेळा गरम पाणी प्या. घराच्या घरी औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. घरी वेळ न घालवता लवकर तपासणी करून योग्य उपचार घ्या. कोरोनाला घाबरू नका पण त्याचे सुपर स्प्रेडर होऊ नका.
डॉ. वर्षा लहाडे, वैद्यकीय अधीक्षक, सिन्नर ग्रामीण कोविड रुग्णालय.
फोटो- २० डॉ. वर्षा लहाडे
===Photopath===
200421\20nsk_15_20042021_13.jpg
===Caption===
फोटो- २० डॉ. वर्षा लहाडे