दहीहंडीच्या आनंदावर कोरोनाचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:48 PM2020-08-08T16:48:43+5:302020-08-08T16:49:53+5:30
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्र म साजरा केला जात असतो. तथापि या वर्षी 31आॅगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

शहरात मागील वर्षी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्याम गंगापत्र यांच्या पुढाकाराने इगतपुरी येथील टिटोलीच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली होती. मात्र या वर्षी लॉकडाउन बरोबरच 144 कलम जारी असल्याने दहीहंडी कार्यक्र मावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा शहरात दहीहंडी उत्सवास मुकावे लागणार असल्याने दहीहंडी फोडणारे गोविंदा व हा खेळ पाहणार्यांच्या उत्साहाला लगाम बसला आहे.