कोरोनामुळे विरजन : मैत्री दिनाचा उत्साह मावळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 07:17 PM2020-08-02T19:17:22+5:302020-08-02T19:19:57+5:30

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड झाला. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेट घेत मैत्री दिन साजरा करता आला नाही, त्यामुळे तरूणाईने आपल्या मित्रांसोबतची जुनी छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत आठवणींना उजाळा दिला

Coronation causes Virjan: Friendship Day excitement subsides | कोरोनामुळे विरजन : मैत्री दिनाचा उत्साह मावळला

कोरोनामुळे विरजन : मैत्री दिनाचा उत्साह मावळला

Next
ठळक मुद्देमैत्रीचा आनंद भेटीगाठीतून व्यक्त करता आला नाही कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड

नाशिक : दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरूणाईच्या आनंदावर विरजन पडले. तरूणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशलमिडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्याने, पर्यटनस्थळे सर्वच ठिकाणी सामसुम असल्याचे चित्र होते.
महाविद्यालयीन जीवनात कट्ट्यांवरून बहरलेली मैत्री अधिकाधिक दृढ होत जाते. मैत्रीचे बंध कायमस्वरूपी टिकून रहावे, यासाठी दरवर्षी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्रपरिवारासोबत तरूणाई एकत्र येत जल्लोष करत असते; मात्र यावर्षी तरुणाईचा मैत्रीदिनाचा उत्साह कोरोनामुळे पुर्णपणे मावळल्याचे दिसून आले. मागील वर्षी जोरदार पावसामुळे मैत्री दिन साजरा करणे युवा वर्गाला शक्य झाले नव्हते, यंदा कोरोनामुळे मैत्रीचा आनंद भेटीगाठीतून व्यक्त करता आला नाही, असा सूर गोदापार्क परिसरात एकत्र आलेल्या काही तरूणांच्या ग्रूपमधून उमटला.
एरवी मैत्री दिनाला कॉलेजरोड, गंगापूररोड, सोमेश्वर मंदीर परिसर, दुधस्थळी धबधबा, फाळकेस्मारक, पांडवलेणी, नेहरू वनोद्यान, अंजनेरी, गंगापूर धरण परिसर गजबजलेला पहावयास मिळतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरूण-तरूणींचे ग्रूप एकत्र येत ‘सेलिब्रेशन’ करतात; मात्र रविवारी (दि.२) तरूणाईच्या पसंतीचे वरील सर्व ठिकाणी निरव शांतता अनुभवयास आली. बोटांवर मोजण्याइतके ग्रूपचा अपवाद वगळता मैत्रीदिन साजरा करताना कोणीही दिसून आले नाही. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे तरूणाईचा मोठा हिरमोड झाला. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेट घेत मैत्री दिन साजरा करता आला नाही, त्यामुळे तरूणाईने आपल्या मित्रांसोबतची जुनी छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत आठवणींना उजाळा दिला तर काहींनी व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसवर छायाचित्र, व्हिडिओ सेट करून मैत्री दिन साजरा केला. तसेच पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण झाल्याने दमटपणा वाढल्यामुळे अल्हाददायक वातावरण रविवारी अनुभवता आलेले नाही.

Web Title: Coronation causes Virjan: Friendship Day excitement subsides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.