देवळा मुद्रांक घोटाळ्यातील सहआरोपीला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:25+5:302021-05-26T04:15:25+5:30
संपूर्ण राज्यात गाजलेल्या देवळा तालुक्यातील मुद्रांक घोटाळा प्रकरणातील सहआरोपी कंत्राटी संगणकचालक आबा पवार हा गेल्या शुक्रवारी देवळा पोलिसांना शरण ...
संपूर्ण राज्यात गाजलेल्या देवळा तालुक्यातील मुद्रांक घोटाळा प्रकरणातील सहआरोपी कंत्राटी संगणकचालक आबा पवार हा गेल्या शुक्रवारी देवळा पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटक केल्यानंतर शनिवारी त्याची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सटाणा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असतानाच त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला. आबा पवार याला त्वरित देवळा शहरातील जि.प. विद्यानिकेतन येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. कोविड सेंटरमध्ये पवार याला दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आबा पवार याची प्रकृति स्थिर असून, त्याला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आबा पवारच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मास्क, शारीरिक अंतर आदी कोरोना नियमावलीचे पालन केल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.