कोरोनामुक्ती, नवीन रुग्णवाढ समान पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:17 AM2021-01-16T04:17:34+5:302021-01-16T04:17:34+5:30
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४) एकूण १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नवीन कोरोना बाधितांमध्ये १६२ रुग्णांची भर ...
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १४) एकूण १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नवीन कोरोना बाधितांमध्ये १६२ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान जिल्हाभरात एकूण तिघांचा मृत्यु झाल्याने एकूण बळींची संख्या २०२१ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १३ हजार १५६ वर पोहोचली असून त्यातील १ लाख ९ हजार ७१५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १४२० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.९६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.४६, नाशिक ग्रामीण ९६.४१, मालेगाव शहरात ९३.३५, तर जिल्हाबाह्य ९५.०३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ६३ हजार ४७४ असून त्यातील ३ लाख ४८ हजार ७५४ रुग्ण निगेटिव्ह तर १ लाख १३ हजार १५६ रुग्ण बाधित आढळून आले असून १ हजार ५६४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.