रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:54 PM2020-08-02T18:54:28+5:302020-08-02T18:55:09+5:30
जानोरी: भाऊ-बहिणीचे प्रेम वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, यंदा कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक गावांमध्ये असलेल्या पाहुण्यांच्या बंदीमुळे भावाबहिणीच्या भेटीवर सावत आले आहे. तर अनेकजण आॅनलाईन रक्षाबंधन साजरे करण्याचा पर्याय स्वीकारणार आहेत.

सर्वत्र करोनाने अहंकार माजवला आहे. अनेक लोक या महामारी रोगात मृत्युमुखी पडले आहे. कुणी आजारी पडले आहे. त्यामुळे प्रत्येकजण रोगाला घाबरून जगत आहे. त्यामुळे रक्षाबंधन सण साजरा कसा करायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे. दरवर्षीप्रमाणे बहीण आपल्याला राखी घेऊन येते. तर भाऊ राया आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देत प्रेमाची माया वृद्धिंगत करतात. तसेच मामांचे लाडके भाचाभाचीही गावाला जाण्यासाठी आतुर असतात. परंतु यावर्षी करोना महामारीमुळे अनेकांचा हिरमोड झालेले आहे. कारण या रोगामुळे कोणालाच या गावावरून त्या गावाला जाता येत नसल्याने रक्षाबंधन सण कसा साजरा करावा असा प्रश्न पडला आहे.