जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर ७० टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:11 PM2020-07-24T16:11:02+5:302020-07-24T16:11:45+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...

Coronation release rate in the district at 70%! | जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर ७० टक्क्यांवर !

जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर ७० टक्क्यांवर !

Next
ठळक मुद्देमहिनाभरात झाली तब्बल १५ टक्के वाढ

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळेच जून महिन्याच्या अखेरीस ५६ टक्क्यांच्या आसपास असलेले जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा सरासरी प्रमाण आता ७० टक्क्यांहून अधिक ७१.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातही मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा वेग सर्वाधिक ८५.७१ टक्क्यांवर गेला आहे.
कोरोनाबाधितांमध्ये वेगाने वाढ होत असली तरी जिल्ह्यातील बाधित बरे होऊन घरी परतण्याच्या प्रमाणातही गत महिनाभरात १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, हीच जिल्ह्याच्या दृष्टीने विशेष दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात सध्या दहा हजार ९६९ कोरोनाबाधित रु ग्णांपैकी सात हजार ७९८ रु ग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रु ग्ण पूर्णपणे बरे होण्याची टक्केवारी जून महिन्याच्या अखेरीस ५६.८८ टक्के इतके होते. म्हणजेच गत महिन्याच्या तुलनेतदेखील रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत १५ टक्के झालेली ही वाढ अत्यंत सकारात्मक बाब आहे. या रुग्णांपैकी केवळ ११ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर, तर ९२ रुग्ण हे आॅक्सिजनवर असून, तेवढेच रुग्ण गंभीर आणि अतिगंभीरच्या श्रेणीत आहेत.
इन्फो
मालेगाव थेट ८५ टक्क्यांवर
रु ग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधून रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.९२ टक्के, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ७१.९६, मालेगाव मनपामधून ८५.७१ टक्के व जिल्हाबाहेरील ८३.१२ टक्के इतके आहे. तसेच आतापर्यंत बळी गेलेल्या ४३३ रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील होते. त्यांना कोरोनाबरोबरच अन्य काही आजारांनीदेखील ग्रासले होते, असा प्रशासनाचा दावा आहे.
इन्फो
महिनाभरातील क्षेत्रनिहाय वाढ
नाशिक ग्रामीणमधून रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण गत महिन्याच्या अखेरीस ५८.७० टक्के होते, त्यात ३.२२ टक्के वाढ झाली आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात केवळ ६१ टक्क्यांवर पोहोचलेल्या प्रमाणात १०.९६ टक्के वाढ झाली आहे, तर मालेगाव मनपामध्ये ७९.०५ टक्के असलेल्या प्रमाणात ६.६५ टक्के इतकी वाढ झाली आहे. जिल्हाबाह्य ६२.९० टक्के इतके कोरोनामुक्तीचे असलेल्या प्रमाणात आता तब्बल २२.८१ टक्क्यांनी झालेली वाढ आरोग्य विभागाच्या दृष्टीने दिलासादायक आहे.

Web Title: Coronation release rate in the district at 70%!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.