कोरोनानिर्बंध उरले नावापुरतेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:41+5:302021-03-17T04:15:41+5:30

----- चित्रपट गृहे, हॉटेल्स या दोन्ही आस्थापनांना फक्त ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात हॉटेलमध्ये हा ...

Coronation restrictions are only for the rest of the name! | कोरोनानिर्बंध उरले नावापुरतेच !

कोरोनानिर्बंध उरले नावापुरतेच !

Next

-----

चित्रपट गृहे, हॉटेल्स

या दोन्ही आस्थापनांना फक्त ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात हॉटेलमध्ये हा नियम पाळला जात नाही. बंद दाराआड सर्वच टेबल हाऊसफुल्ल दिसत आहेत.

-----

विवाह समारंभ

आजही ग्रामीण व शहरी भागात शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकले जात आहेत. त्यावर अटकाव करण्यासाठी कोणतीही यंत्रणा धजावत नाही.

------

अंत्यविधी

अंत्यविधीसाठी २० लोकांनाच उपस्थितीचा नियम असला तरी, भावनिक मुद्दा पुढे करून अंत्यविधीसाठी स्मशान भूमीत शेकडो नातेवाईक, हितचिंतक हजेरी लावत आहेत.

-------

कार्यालये

शासकीय कार्यालयांमध्ये सध्या मार्च एण्डींगचे कामे सुरू असल्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, महसूल विभागात सर्वच कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आल्याने कार्यालये गजबजली आहेत.

-------

गृहविलगीकरण

बऱ्याचशा नागरिकांनी खासगी लॅबमधून कोरोना चाचणी करून खासगी डॉक्टरांमार्फत उपचार सुरू केल्याने त्याची नोंद शासकीय यंत्रणेकडे नाही. परिणामी गृह विलगीकरण रुग्णांच्या घराबाहेर कोणताही फलक लावलेला नाही.

Web Title: Coronation restrictions are only for the rest of the name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.