कोरोनाची धास्ती अन्‌ जमावबंदीमुळे महापालिकेची महासभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:44+5:302021-02-20T04:38:44+5:30

नाशिक : काेरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला असून, त्यामुळे गुरुवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश ...

Coronation scare | कोरोनाची धास्ती अन्‌ जमावबंदीमुळे महापालिकेची महासभा तहकूब

कोरोनाची धास्ती अन्‌ जमावबंदीमुळे महापालिकेची महासभा तहकूब

Next

नाशिक : काेरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केला असून, त्यामुळे गुरुवारी (दि.१८) महापालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकूब केली आहे. ही सभा दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली असली तरी सभागृहातदेखील होणार होती. त्यामुळे सुमारे पंचवीस नगरसेवकदेखील उपस्थित होते; परंतु जमावबंदीमुळे ही सभाच तहकूब करावी लागली.

गेल्या वर्षभरापासून महापालिकेच्या बहुतांश सभा दूरदृश्यप्रणालीद्वारे होत आहेत. मात्र, नोव्हेंबरनंतर कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यासारख्ये चित्र निर्माण झाल्यानंतर आता अशा प्रकारे दूरदृश्यप्रणालीद्वारे सभा न घेता प्रत्यक्ष सभागृहातच सभा घेण्याची मागणी होत होती. त्यातच राज्य शासनानेदेखील महासभा वगळता अन्य सर्व समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घेण्याची परवानगी दिली होती; परंतु तरीही नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजप जाणीवपूर्वक प्रत्यक्ष सभागृहात येण्यास टाळत असल्याचा आरोप केला होता. दूरदृश्यप्रणालीद्वारे सभा घेताना जाणीवपूर्वक तांत्रिक बिघाड केला जात असल्याचे आरोपही विरोधकांनी केले होते. त्यामुळे गुरुवारी (दि.१८) सुमारे पन्नास टक्के सदस्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष महासभा घेण्याचे नियोजन महापौरांनी केले आणि पक्षाच्या संख्येच्या आधारेच सभागृहात उपस्थिती असावी, असे सुचवले होते. मात्र, सभेची अधिसूचना जारी केल्यानंतर आठ दिवसांतच शहरात चित्र बदलले असून, शहरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले. त्यामुळे गुरुवारी (दि.१८) महासभेचे काम सुरू होताच महापाैर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनामुळे महासभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. मात्र, ही सभा पुन्हा केव्हा होणार, हे जाहीर केलेले नाही.

Web Title: Coronation scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.