प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:49 PM2020-05-11T21:49:14+5:302020-05-11T23:32:46+5:30
सिन्नर : गर्भवती महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच नवजात बालकही कोरोनामुक्त असावे यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी करण्याचा उपक्रम सिन्नर आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.
सिन्नर : गर्भवती महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच नवजात बालकही कोरोनामुक्त असावे यासाठी आरोग्य
विभागाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रातील गर्भवती महिलांची कोरोनाचाचणी करण्याचा उपक्रम सिन्नर आरोग्य विभागाच्या
वतीने हाती घेण्यात आला आहे. येत्या ३० तारखेच्या आत गर्भारपणाचा काळ संपून प्रसूत होणाऱ्या तालुक्यातील चार कंटेन्मेंट झोनमधील ११ गर्भवती महिलांच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात असा उपक्रम राबविणारा सिन्नर हा पहिला तालुका ठरला आहे.
तालुक्यात वारेगाव, वडगाव -सिन्नर, सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसर आणि डुबेरे नाका येथील माधवबाग परिसर या चार ठिकाणी ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही चारही ठिकाणे आरोग्य विभागाने कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. सध्या त्यातील वारेगाव येथील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात आले आहे.
शिवाजीनगर येथील ५, वडगाव - सिन्नर येथील ३, वारेगाव येथील ३ अशा ११ गर्भवतींचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय वडगाव-सिन्नर या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी प्रसूत झालेली महिला आणि तिच्या दोन दिवसाच्या बाळाचाही स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आला आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ. योगीता ठाकरे, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. सुशील पवार, डॉ. संजय वळवे, प्रतिबंधित क्षेत्रातील आशा, अंगणवाडीसेविका यांच्या सर्वेक्षणातून
गर्भवती महिलांची माहिती
संकलित करण्यात आली
आहे. टेक्निशियन नितीन
घोटेकर, प्रवीण हायलिंगे यांनी
या महिलांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले.