कोरोनायोद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:20 PM2020-07-28T22:20:33+5:302020-07-29T00:45:21+5:30
मालेगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या काळात विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी,परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा दिली. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत शहरातील मुस्लीम सेवा फाउण्डेशन धुळे- मालेगावतर्फे निमा-१ केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मालेगाव : गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या काळात विविध आरोग्य केंद्रातील कर्मचारी,परिचारिका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन आरोग्यसेवा दिली. त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत शहरातील मुस्लीम सेवा फाउण्डेशन धुळे- मालेगावतर्फे निमा-१ केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनायोद्धा म्हणून गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी निमा-१ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शगुफ्ता शादाब होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून मुस्लीम सेवा फाउण्डेशनचे मुख्य अधिकारी अब्दुल खालीक शेख सलीम उपस्थित होते. व्यासपीठावर याकूब काजी, राईट वे ट्रस्टचे अध्यक्ष युनूस खान, उपाध्यक्ष शेख नूर, सचिव अबरार शेख, उपाध्यक्ष अकबर खान, खजिनदार अब्दुल रहीम, सदस्य आरीफ खान, इब्राहीम शेख, रियाज शेख आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी शादाब यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते अश्विनी गांगुर्डे, स्वाती खैरनार, मनीषा पाटील, सविता सोनवणे, शीतल ताडे-वैद्य, नाजमीन हुसेन यांच्यासह आशा सेविकांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जास्मीन अन्सारी, फरजाना शेख, राहुल सूर्यवंशी आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक शिंदे यांनी केले.