coronavirus: कृषिमंत्र्यांचे मालेगावला ५ तास मौनव्रत आंदोलन, प्रशासनावर ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 05:23 AM2020-05-10T05:23:57+5:302020-05-10T05:24:32+5:30
दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून मालेगावच्या परिस्थितीबाबत जाणीव करून देत ‘मालेगावच्या शेवटच्या नागरिकाच्या अंत्यविधीलाच या’ अशा शब्दांत खडसावले.
नाशिक - स्थानिक व जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला गांभीर्य उरले नसल्याची भावना व्यक्त करत संतप्त झालेले कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील हनुमान व गणपती मंदिरात बसून मौनव्रत धारण करत निषेध नोंदविला. त्यांनी शहर व तालुक्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्याचेही साकडे हनुमानाला घातले. त्यांचे आंदोलन पाच तास सुरू होते.