Coronavirus : बिल देण्यास टाळाटाळ; नाशिकला २ कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 09:39 AM2021-05-23T09:39:21+5:302021-05-23T09:39:54+5:30
नाशिकरोड येथील आणखी एक रुग्णालय रडारवर असून त्याच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येाणार आहे.
नाशिक : अवाजवी बिल आकारणी तसेच महापालिकेकडून मागणी करूनही बिलांची माहिती न दिल्याचा ठपका ठेवून महापालिकेने दोन रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्याची कारवाई केली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. नाशिकरोड येथील आणखी एक रुग्णालय रडारवर असून त्याच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येाणार आहे.
गंगापूर रोडवरील मेडीसिटी आणि पंचवटीतील रामालयम रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द करण्यात आली आहे. या ठिकाणी बिल देण्यास टाळाटाळ होत होती. त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
राज्य सरकारने कोरोना उपचाराचे दर ठरवून दिले असून, त्यानुसार बील आकारले जाते किंवा नाही, यासाठी पालिकेने लेखापरीक्षक नियुक्त
केले आहेत. यात मेडीसीटी आणि रामायलम रुग्णालयाकडून बिले देण्यास सतत टाळाटाळ होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांची कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आली, अशी माहिती मुख्य लेखा परीक्षक सोनकांबळे
यांनी दिली.