CoronaVirus : नाशिकमध्ये गोंधळात गोंधळ; मद्याच्या दुकानाबाहेर मोठी रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:31 PM2020-05-04T12:31:26+5:302020-05-04T12:31:44+5:30
कोणती दुकाने उघडावी आणि बंद ठेवावी याबाबत संभ्रम असतानाच दुकाने सुरू झाली.
नाशिक- कोरोनाबाधितांमुळे नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही आज बहुतांश दुकाने खुली झाली आहेत. त्यातच अनेक मद्याची दुकाने खुली झाल्याने या दुकानांमध्ये अक्षरशः रांगा लागल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार अगतिक झाले होते.अनेकांनी रविवारी (दि.३) दुकाने स्वच्छ करून उघडण्याची तयारी सुरू झाली होती. त्यातच कोणती दुकाने उघडावी आणि बंद ठेवावी याबाबत संभ्रम असतानाच दुकाने सुरू झाली.
नाशिक शहरात रुग्ण संख्या मर्यादित असली तरी महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये आहे. रविवारी (दि. ४) रात्री उशिरा जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि ऑरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात
अत्यावश्यक सेवा असणा-या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले आहे. झेरॉक्स व स्टेशनरी, हार्डवेअर, गॅरेज, वाहनांचे शो रूम, सर्व्हिस स्टेशन्स आणि अन्य अनेक दुकाने सुरू झाले आहे.
विशेष म्हणजे शहरातील अनेक मद्य दुकाने सुरू होताच तळीरामांनी गर्दी केली होती. नाशिकरोड येथील दत्त मंदिर आणि जीपीओ जवळील एका मद्य दुकानात रांगा लागल्या असून, फिजिकल डिस्टसिंगचा पूर्णत: फज्जा उडाला आहे.