CoronaVirus News in Nashik : नाशिकमधून नेरमध्ये खत आणणारा 'तो' मृत ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:14 PM2020-06-01T19:14:56+5:302020-06-01T19:21:30+5:30
CoronaVirus Latest Marathi News in Nashik: नाशिक येथील एका ट्रकद्वारे रविवारी नेर आणि मांगलादेवी येथे खत आणण्यात आले.
नेर (यवतमाळ) : नाशिकहून खत आणणारा मृत ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नेरमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या चालकाने ज्या ठिकाणी खत टाकले आणि औषधी घेतली ती प्रतिष्ठाने तसेच ग्रामीण रुग्णालय नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने सोमवारी सॅनिटाईज केले.
नाशिक येथील एका ट्रकद्वारे रविवारी नेर आणि मांगलादेवी येथे खत आणण्यात आले. या दोनही ठिकाणी खत उतरविल्यानंतर ट्रक परतीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान, या ट्रकवरील चालकाची प्रकृती बिघडली. त्याने येथील अमरावती रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ ट्रक थांबविला. सोबत वाहक होता. त्याला खानावळीतून जेवण आणायला सांगितले. तो परत आला त्यावेळी चालक निपचित पडून दिसला.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आयुष विभागाने आणलं 'हे' खास किट; असा होणार फायदाhttps://t.co/iHDDzaWanW#CoronaUpdatesInIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaWarriors
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
या प्रकाराची माहिती होताच शहरातील काही युवकांनी चालकाला येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. याठिकाणी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ठाणेदार प्रशांत मसराम यांनी रुग्णालयाला भेट दिली. या चालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तो पॉझिटिव्ह निघाला. अहवाल प्राप्त होताच तालुक्याचे प्रशासन अलर्ट झाले. चालकाने ज्या ठिकाणी खत उतरविले, औषधी खरेदी केली ती प्रतिष्ठाने आणि ग्रामीण रुग्णालयाचा परिसर सॅनिटाईज करण्यात आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांनी नेर आणि मांगलादेवीला भेट देवून स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा?, डॉक्टरांनी केला अभ्यासhttps://t.co/NixBTUy869#CoronavirusIndia#coronaupdatesindia#COVID19India#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...
CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम