कोरोनामुळे ८ हजार मृत्यू पण मदत अवघी ३२६ जणांना; असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:54 PM2022-01-24T12:54:42+5:302022-01-24T12:56:09+5:30
ज्यांच्या कुटुंबात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसापैकी एकाने ५० हजारांच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. डब्लूडब्लूडब्लू डॉट महाकोविड ...
ज्यांच्या कुटुंबात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसापैकी एकाने ५० हजारांच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. डब्लूडब्लूडब्लू डॉट महाकोविड १९ डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज अपलोड करता येतो. यासाठी मयत झालेल्याचे मृत्यू प्रमाणपत्र, कोरेाना उपचार, पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट अशी माहिती अत्यावश्यक असते.
१२ हजार अर्ज
कोविड सानुग्रह मदतीसाठी जिल्ह्यातून १२,८०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. कोरोनामुळे रुग्णालयात किंवा घरी मयत झालेले असतील किंवा कोरोना उपचारानंतर घरी गेल्यानंतरही मृत्यू ओढवला असेल, अशा मयत वारसांना ५० हजारांचे सानुग्रह दिले जात आहे.
शहरातून ५ हजार अर्ज मंजूर करण्यात आलेल्या ६,३१० अर्जांमध्ये नाशिक शहरातील अर्जांची संख्या ५,१२८ इतकी आहे. नाशिक ग्रामीणचे ९१९, तर मालेगावमधील २६३ प्रकरणांचा त्यामध्ये समावेश आहे. मालेगाव मनपा हद्दीतील ११ जणांना अद्यापपावेतो मदत मिळालेली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील १३२ जणांना मदत देण्यात आली आहे.
३२६ जणांनाच मदत
कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गेली. कुणाचे वडील, आई, कुणाचे भाऊ, पती, पत्नी यामुळे अनेक निराधार झाले तर कुणी अनाथ झाले. अशा कुटुंबीयांना निदान थोडा दिलासा मिळावा, यासाठी शासनाकडून वारसांना ५० हजारांचे अनुदान दिले जात आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ३०४ वारसांना कोराेना सानुग्रहाचा लाभ मिळाला आहे.
अर्जातून काय त्रुटी
मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांमध्ये अपूर्ण अर्जांची संख्या अत्यंत कमी आहे. अपूर्ण कागदपत्रे किंवा एकापेक्षा अधिक वारसदारांना दावा केला तर अर्जमंजुरीस अडचण निर्माण होऊ शकते. कोविडमुळे मृत्यू झाल्याचा पुरेसा पुरावा महत्त्वाचा आहे.