CoronaVirus News : दिलासादायक! नाशिक ‘गो कोरोना’च्या उंबरवठ्यावर; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:23 PM2022-02-09T12:23:08+5:302022-02-09T12:37:31+5:30
नाशिकमध्ये कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ...
नाशिकमध्ये कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात म्हणजेच २५ जानेवारीला २९४४ इतके बाधित रुग्ण आढळून आले होते. आता दहा दिवसांनंतरचा आलेख पाहिला तर ७ फेब्रुवारीला रुग्ण संख्या ३८९ इतकी खाली आली आहे. याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे.
पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ४४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे नाशिककरांवर काही प्रमाणात निर्बंधही आले होते. परंतु आता रुग्ण संख्या घटत असल्याने पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्क्यांवर आला आहे.
सध्या उपचारार्थी ४ हजार
जिल्ह्यात आजवर ४ लाख ७२ हजार काेरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ६० हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के इतके आहे.
रुग्ण संख्येचा आलेख
१फेब्रुवारी : १४८२
२ फेब्रुवारी : १०८६
३ फेब्रुवारी : ८९५
४ फेब्रुवारी : ८२५
५: फेब्रुवारी : ६६७
६ फेब्रुवारी : ६०२
७ फेब्रुवारी : ३८९
बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण
१फेब्रुवारी : २८७४
२ फेब्रुवारी : २३८८
३ फेब्रुवारी : ४३३९
४ फेब्रुवारी : २६७२
५: फेब्रुवारी : २३५०
६ फेब्रुवारी : ९४८
७ फेब्रुवारी : ८८१