आढळला कोरोनाबाधित बेवारस मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 09:05 PM2021-05-09T21:05:58+5:302021-05-10T00:49:12+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निफाड फाटा मरीमाता मंदिरासमोर दुपारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या ...

Coroned unclaimed bodies found | आढळला कोरोनाबाधित बेवारस मृतदेह

आढळला कोरोनाबाधित बेवारस मृतदेह

Next
ठळक मुद्देपिंपळगात बसवंत शहरात खळबळ

पिंपळगाव बसवंत : परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निफाड फाटा मरीमाता मंदिरासमोर दुपारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व त्याची तपासणी केली असता तो कोरोना संशयित मृतदेह असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली.

पिंपळगाव बसवंत निफाड फाटा या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मरीमाता मंदिराच्या समोर एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिकांनी पोलीस प्रशासन यांना माहिती देताच पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या मृतदेहाला कोरोनाचे नियम व सतर्कता राखत ताब्यात घेतले. सध्या कोरोनाचा कहर जास्त असल्याने कोरोनामुळेच सदर वृद्ध इसमाचा मृत्यू झाला असेल असा प्राथमिक संशय आरोग्य विभागाने वर्तविला. मात्र सदर इसम वृद्ध असून खोच जर कोरोनाबाधित असेल तर ते पिंपळगाव शहरात कसा आला किंवा कोणी आणून सोडले तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.

पिंपळगाव बसवंत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळला तो मृतदेह कोरोनाबाधित असल्याचा संशय आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे, असे असेल तर तो इसम पिंपळगाव बसवंत शहरात आला कसा आणि आला तर तो कुठे कुठे गेला किंवा त्याला पिंपळगाव शहरात आणून सोडले तर नाही ना! त्यामुळे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कारवाई करावी.
एक नागरिक
पिंपळगाव बसवंत

मृतदेहामुळे शहरात भीतीचे वातावरण
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बेवारसपणे एक मृतदेह आढळला. आरोग्य विभागाने कोरोनाबाधित असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मयत इसम रानवडचा असून त्याचा मृतदेह बेवारसपणे पिंपळगावात आढळलाच कसा अशी भीती व्यक्त होत आहे.

सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने शहरात आढळला मृतदेह कोरोनाबाधित असल्याचा प्राथमिक संशय आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे आणि सतर्कता ठेवावी, तसेच सदर इसमाच्या मृत्यूबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी करावी.
- गणेश बनकर, सदस्य पिंपळगाव ग्रामपंचायत

Web Title: Coroned unclaimed bodies found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.