कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 01:57 AM2020-09-10T01:57:46+5:302020-09-10T01:58:40+5:30
मनपाच्या कथडा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया सफाई कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान,या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.
नाशिक : मनपाच्या कथडा येथील रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाºया सफाई कामगारास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुरुवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान,या कर्मचाºयाला तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.
मनपाच्या रुग्णालयात बाधित महिला स्वच्छतागृहात गेली असता कैलास बाबूराव शिंदे या सफाई कामगाराने मद्यधुंद अवस्थेत तिच्या मागे जाऊन विनयभंग केल्याचा आरोप असून, या कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून या कर्मचाºयाला निलंबित करण्यात आलेले नव्हते त्यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक माधुरी बेलेकर आदी उपस्थित होते.
यावेळी झाकीर हुसेन रु ग्णालयात महिला कक्षासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, यावेळी अॅँटिजेन टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर याविषयांवरही आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.