कोरोनामुळे दंतवैद्यक सेवा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 03:48 PM2020-04-08T15:48:46+5:302020-04-08T15:49:36+5:30

कोरोना विषाणूंचा प्रसार मुखाद्वारे सर्वात वेगात होत असल्याने दंतवैद्यक सेवा स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बोंडे, सचिव डॉ. समीर सोनार, कम्युनिटी हेल्थचे प्रमुख डॉ. प्रशांत पारखे, डॉ. चेतन चौधरी आणि डॉ. नीरज जमधडे यांनी केले आहे.

 Coroner postponed dental services | कोरोनामुळे दंतवैद्यक सेवा स्थगित

कोरोनामुळे दंतवैद्यक सेवा स्थगित

Next
ठळक मुद्दे फोनवर रु ग्णांना सल्ले

नाशिकरोड : कोरोना विषाणूंचा प्रसार मुखाद्वारे सर्वात वेगात होत असल्याने दंतवैद्यक सेवा स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बोंडे, सचिव डॉ. समीर सोनार, कम्युनिटी हेल्थचे प्रमुख डॉ. प्रशांत पारखे, डॉ. चेतन चौधरी आणि डॉ. नीरज जमधडे यांनी केले आहे.
संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सध्या देशात सर्व दंतवैद्यकांनी सेवा बंद ठेवली आहे. बहुतांश दंतवैद्यक फोनवर रु ग्णांना सल्ले देत आहेत. कोरोना विषाणूची लागण ही प्रामुख्याने थुंकी अथवा शिंकण्याने होऊ शकते. दातांच्या सर्व उपचारांमध्ये डेंटिस्ट रु ग्णाशी खूप जवळून काम करतात. बहुतांश उपचारांमध्ये पाण्याचा अथवा हवेचा फवारा मारला जात असल्याने तोंडातील थुंकी हवेत उडते. त्याला अरोसोल म्हणतात. हा एरोसोल पुढील बरेच तास हवेत तसाच राहतो. यामुळे कोरोनाबाधितावर असे उपचार केल्यास डॉक्टर, असिस्टंट तसेच बाकीच्या रु ग्णांनासुद्धा एरोसोलमुळे कोरोना होऊ शकतो. डेंटल चेअर, इन्स्ट्रुमेंट, टेबल, खुर्ची यांसह बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांचा स्पर्श होतो. अशावेळी कोरोनाचे विषाणू अशा जागेवर राहून इतर रुग्णांना बाधित करू शकतात. या जागा वेळोवेळी स्वच्छ केल्या जात असल्या तरी त्यावरील विषाणू शंभर टक्के मरतीलच हे खात्रीने सांगता येत नाही. एरोसोल निर्जंतुक करता येत नाही. त्यामुळे दंतोपचारामध्ये या विषाणूचा संसर्ग डेंटिस्ट, असिस्टंट व मुख्य म्हणजे पुढील अनेक रु ग्णांना होण्याची शक्यता कितीतरी पटींनी जास्त आहे. कोरोना विषाणूची लक्षणे दिसायला बरेच दिवस लागत असल्याने रुग्णाला निरोगी असल्यासारखे वाटते. तरी ते या विषाणूचे कॅरियर असू शकता. अशा वेळी तुमच्या फक्त तपासणीनेदेखील डेंटल चेअर, कन्सल्टिंग टेबल, खुर्ची, रिसेप्शन रूममधील जागा तसेच इतर अनेक ठिकाणी हे विषाणू येऊन इतर रु ग्णांना याची बाधा होऊ शकते.
दातांच्या रु ग्णांवर उपचारासाठी इन ९५ मास्क, फेस शिल्ड, गाऊन आदी साधने लागतात. सध्या हे साहित्य कोरोना रु ग्णांना बरे करण्यासाठी झगडणाºया डॉक्टरांना देण्यात येत आहेत. त्यामुळे दातांच्या डॉक्टरांकडे त्याची टंचाई आहे. बहुतांश दंतोपचार हे टाळता येत नसले तरी औषधे घेऊन काही दिवस पुढे ढकलणे शक्य असते. सध्याच्या स्थितीत तसे करणेच हे सर्वांच्याच हिताचे ठरेल. त्यामुळे डेंटिस्टना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रशांत पारखे यांनी केले आहे.

Web Title:  Coroner postponed dental services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.