अतिक्रमणधारकांवर मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:07 AM2020-09-20T01:07:40+5:302020-09-20T01:08:10+5:30
त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
सिडको : त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनपा अतिक्रमण विभागातर्फे नागरिकांच्या तक्रारीनंतर कर्मयोगीनगर ते गोविंदनगरमार्गे त्रिमूर्ती चौक या भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी दत्त मंदिर चौक येथे अतिक्रमण विभागाचे पथक आले असता त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या फळविक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली असता विक्रेत्यांना या गोष्टीचा राग येऊन त्यांनी थेट मनपा कर्मचारी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. काहीकाळ चाललेल्या या वादावादीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. यावेळी मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, कार्यालयीन अधीक्षक दशरथ भवर, अतिक्रमण पथक प्रमुख एस. एस. शिंदे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे सुमारे वीस कर्मचारी या मोहिमेत उपस्थित होते.