रहिवाशी वसाहतीतील कारखान्यांवर मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:45+5:302021-06-29T04:11:45+5:30

सोमेश्वर कॉलनीतील खासगी मालकीच्या मोकळ्या भूखंडावर ॲसिडवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू होता. ॲसिडपासून निर्माण होणाऱ्या वायूमुळे परिसरातील नागरिकांना त्वचाविकार, ...

Corporation action on factories in residential colony | रहिवाशी वसाहतीतील कारखान्यांवर मनपाची कारवाई

रहिवाशी वसाहतीतील कारखान्यांवर मनपाची कारवाई

Next

सोमेश्वर कॉलनीतील खासगी मालकीच्या मोकळ्या भूखंडावर ॲसिडवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू होता. ॲसिडपासून निर्माण होणाऱ्या वायूमुळे परिसरातील नागरिकांना त्वचाविकार, डोक्याचे आजार, फुप्फुसाचा आजार, डोळ्यांचे आजार व विविध आजारांना सामोरे जावे लागले होते. स्थानिक नागरिकांनी प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली होती. पण उपयोग न झाल्याने नागरिकांनी नगरसेवक संतोष गायकवाड यांच्याकडे धाव घेतली. नगरसेवक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व मनपाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. मनपाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, संबंधित व्यावसायिकाकडे नगर रचना, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच अग्निशमन विभाग अशा एकाही विभागाची परवानगी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यावसायिकाला त्वरित उद्योग बंद करण्यास सांगितले. तसेच उद्योग सुरू करण्यापूर्वी सर्व विभागांच्या परवानग्या आणण्याचे निर्देश दिले.

फोटो :- नागरी वसाहतीत विनापरवाना सुरू असलेल्या रासायनिक कंपनीवर बंदची कारवाई करताना विभागीय अधिकारी नितीन नेर, समवेत नगरसेवक संतोष गायकवाड आदींसह मनपा अधिकारी. (फोटो २८ सातपूर १, सातपूर २)

Web Title: Corporation action on factories in residential colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.