पालिकेला जीएसटीचे अनुदान वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:01 AM2017-08-03T01:01:14+5:302017-08-03T01:01:14+5:30
नाशिक : ‘एक राष्टÑ एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने आॅगस्ट महिन्याचे ७३.४० कोटी रुपये अनुदान महापालिकेला वितरित करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. ठरल्याप्रमाणे महिन्याच्या पाच तारखेच्या आत भरपाई अनुदान दिले जात असल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

एलबीटी रद्द झाल्यानंतर आता जुलै २०१७ पासून जीएसटीअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई अनुदान दिले जात आहे. नाशिक महापालिकेला मार्च २०१८ अखेर दरमहा ७३.४० कोटी रुपये भरपाई अनुदान दिले जाणार आहे. जुलै महिन्याचे अनुदान महापालिकेला वेळेत प्राप्त
झाले होते.