स्टार मानांकनासाठी मनपाचेही लॉबिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:52 PM2020-06-16T22:52:02+5:302020-06-17T00:34:32+5:30

नाशिक : स्वच्छता अभियानाअंतर्गत नाशिक महापालिकेची कामगिरी चमकदार असताना अवघा एकच स्टार मिळाला तर धुळे- जळगाव महापालिकेने थ्री स्टार मिळवला आहे.

Corporation lobbying for star rating? | स्टार मानांकनासाठी मनपाचेही लॉबिंग?

स्टार मानांकनासाठी मनपाचेही लॉबिंग?

googlenewsNext

नाशिक : स्वच्छता अभियानाअंतर्गत नाशिक महापालिकेची कामगिरी चमकदार असताना अवघा एकच स्टार मिळाला तर धुळे- जळगाव महापालिकेने थ्री स्टार मिळवला आहे. त्याचा शोध घेताना प्रशासन लॉबिंगमध्ये कमी पडल्याचे वृत्त आहे. अभियनासाठी सल्ला देण्यासाठी अनेक अधिकृत संस्था असून, त्या माध्यमातून केवळ सल्लाच नव्हे तर दिल्लीपर्यंत लॉबिंग करण्याची कामे केली जात असल्याची चर्चा आहे. यामुळेच की काय परंतु आता नाशिक महापालिकेनेदेखील आपले मानांकन सुधारण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
केंद्र शासनाच्या वतीने देशभरात स्वच्छता सर्वेक्षण राबविण्यात येते. त्यात देशभरातील पाच हजार शहरे सहभागी होतात. गेल्या वर्षीपासून शासनाने त्याच्या मूल्यांकनात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दर तीन महिन्याला मूल्यमापन करून मानांकन दिले जाते.
गेल्यावर्षी महापालिका पहिल्या दहामध्ये सलग दोन वेळा आल्यानंतर महापालिकेने स्वमूल्यांकनात स्वत:ला थ्री स्टार दिले होते. मात्र, त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या मूल्याकंनात ह्यबह्ण दर्जा असलेल्या नाशिक महापालिकेला अवघा सिंगल स्टार मिळाला. तर ‘ड’ दर्जाच्या धुळे आणि जळगाव महापालिकेला थ्री स्टार मिळाला. त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. महापालिकेने त्यासंदर्भात अधिकृत-रीत्या अपील केले आहे.
तथापि, मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या तुलनेत छोट्या आणि अपुऱ्या सुविधा असणाºया महापालिकांनी या अभियानासाठी सल्लागार कंपन्या नियुक्त केल्या होत्या. नाशिक महापालिकेची कामगिरी चांगली असल्याने त्यांनी अशाप्रकारे सल्लागार कंपनी नियुक्त केली नव्हती. मात्र, आता नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगावसारख्या अनेक शहरांच्या कामगिरीचा शोध घेताना त्यांनी अशाप्रकारे सल्लागार कंपन्या नियुक्त केल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे सल्लागार
संस्थाच्या माध्यमातून लॉबिंग होत असल्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
महापालिकेने आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी आता अशाच प्रकारे सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. लवकरच महासभेच्या पटलावर यासंदर्भातील विषय चर्चेला येणार आहे. सदरचा विषय मंजूर होणे सहज शक्य असले तरी एकूणच शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या स्पर्धेतील पारदर्शकतेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
---------------------
प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
४महापालिकेने स्वच्छता अभियानात प्रबळ आणि वास्तव दावेदारी करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांना प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.

Web Title: Corporation lobbying for star rating?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक