अनधिकृत नळजोडणीकडे मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:57 PM2020-07-17T17:57:14+5:302020-07-17T17:58:48+5:30

इंदिरानगर : वडाळा गावातील मेहबूबनगरसह परिसरात सुमारे ५० टक्के अनधिकृत नळजोडण्यांमुळे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी बुडत असताना पाणीपुरवठा विभागाला ...

Corporation neglects unauthorized plumbing | अनधिकृत नळजोडणीकडे मनपाचे दुर्लक्ष

अनधिकृत नळजोडणीकडे मनपाचे दुर्लक्ष

Next

इंदिरानगर : वडाळा गावातील मेहबूबनगरसह परिसरात सुमारे ५० टक्के अनधिकृत नळजोडण्यांमुळे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी बुडत असताना पाणीपुरवठा विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वडाळा गावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता. कालांतराने या भागाचा विकास होऊन त्या ठिकाणी घरे उभी राहिली. त्यात अण्णा भाऊ साठे, मुमताजनगर, मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर यासह परिसरात लोकवस्ती वाढली असून, परिसरातील ५० टक्के नागरिकांनी महापालिकेच्या जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली आहे. या परिसरात काही दलाल सुमारे पाच हजार रुपये घेऊन अनधिकृतपणे जलवाहिनीतून जोडणी करून देत आहे. सुमारे एक हजाराहून घरमालकांनी अनधिकृत जोडणी करून घेतली असून, त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महापालिकेने नळजोडणी अधिकृत करून घेण्याचे आवाहन करूनही अद्यापर्यंत कोणीही नळजोडणी अधिकृत करून न घेतल्याने लाखो लिटर पाण्याची चोरी सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे परिसरात नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.
 

Web Title: Corporation neglects unauthorized plumbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.