पथदीप बदलणारे मनपाचे वाहन कलंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:13 AM2021-02-14T04:13:56+5:302021-02-14T04:13:56+5:30
महापालिका प्रशासनाच्यावतीने पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जुने पथदीप काढून त्याठिकाणी एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
महापालिका प्रशासनाच्यावतीने पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जुने पथदीप काढून त्याठिकाणी एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी गोरक्षनाथ मंदिराजवळ एका पोलवर एलईडी दिवा लावण्यासाठी विद्युत विभागाची क्रेन असलेली चारचाकी त्या ठिकाणी उतारावर क्रमांक (डी एल १ एल ०१७१) आली मात्र रस्त्याला उतार खूप असल्याने सदर चारचाकी आयशर वाहन पायऱ्यांवरून घसरत थेट एका बंगल्याच्या दरवाजाजवळ येऊन अडकली. सदर ठिकाणी मोठा खड्डा असल्याने वाहन खाली घसरले गेले. त्यात महेंद्र कदम यांच्या मालकीची उभी असलेली (एम एच १५ एफ सी ८१५५) ही चुकाची दबली गेल्याने दुचाकीचे नुकसान झाले. काही वेळाने संबंधित ठेकेदार व पंचवटी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खड्ड्यात अडकलेली चारचाकी अन्य क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली. घटना घडली तेव्हा रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. (फोटो १३ मनपा)
Attachments area