चारशे एकरच्या आयटी हबसाठी मनपा सल्लागार नेमणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 01:31 AM2022-01-08T01:31:25+5:302022-01-08T01:31:47+5:30
आडगाव शिवारात महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या आय टी हबसाठी सुमारे चारशे एकर जागा खासगी व्यक्तींकडून मिळणार असल्याने आता त्याची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून लवकरच या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत.
नाशिक - आडगाव शिवारात महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या आय टी हबसाठी सुमारे चारशे एकर जागा खासगी व्यक्तींकडून मिळणार असल्याने आता त्याची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून लवकरच या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मुळातच आयटी प्रकल्प घाईघाईने करण्याची महापौर सतिश कुलकर्णी यांची तयारी आहे. जानेवारी महिन्यातच म्हणजे आचारसंहिता लागू हेाण्यापूर्वीच आयटी हबचे भूमिपूजन करण्याची तयारी महापौरांची तयारी आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने घाईघाईने सल्लागार नियुक्तीसाठी प्रस्ताव मागवले असून पुढील आठवड्यात नियुक्ती केली जाणार आहे.
नाशिक शहरात आयटी हब आयटी शिवारात साकारण्यासाठी महापालिकेेने तयारी केल्यानंतर सुरूवातीला दहा एकरचा एकच भूखंड प्रशासनाकडे ताब्यात होता, मात्र नंतर खासगी जागा मालकांना आवाहन केल्यानंतर तब्बल चारशे एकर जागा मिळणार आहे.