महापालिका देणार पुढील वर्षापासून स्वागतात योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:10 AM2019-06-20T01:10:54+5:302019-06-20T01:11:37+5:30
गेल्यावर्षी महापालिकेने पालखी स्वागतासाठी निधी नाकारला असला तरी आता मात्र आयुक्तांनी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढील वर्षापासून महापालिका पालखीच्या स्वागतासाठी योगदान देईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत सोहळ्याप्रसंगी दिले.
नाशिक : गेल्यावर्षी महापालिकेने पालखी स्वागतासाठी निधी नाकारला असला तरी आता मात्र आयुक्तांनी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पुढील वर्षापासून महापालिका पालखीच्या स्वागतासाठी योगदान देईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत सोहळ्याप्रसंगी दिले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव आल्यास अनुदानात भरघोस वाढ करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद केले.
त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या पालखीचे बुधवारी सकाळी त्र्यंबकरोडवरील पंचायत समितीच्या प्रांगणात स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतप्रसंगी रथाचे आगमन झाल्यानंतर साग्रसंगीत पूजन करून सर्व मान्यवरांनी पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वागत सोहळ्याप्रसंगी सर्व वीणेकरी आणि मानकऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते ,लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी ज्याप्रमाणे दुष्ट नव्हे तर दुष्ट प्रवृत्ती नष्ट होण्याची गरज असल्याचे सांगितले होते, तसे घडले तरच समाज खºया अर्थाने चांगला होणार असल्याचे सांगितले. माउलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतून विश्वबंधुत्वाचा दिलेला संदेश प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती दररोज जे करते ती क्रिया असते, मात्र चांगले कार्य करणे हे कर्म असते. त्यामुळे तुमची सेवा करणे हा आमच्या खाकीचा धर्म असून हे कर्म करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
पंचवटीत वारकऱ्यांचा मुक्काम
वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या विठूमाउलीच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडी पालखीचे गणेशवाडी येथील भाजीमंडईत बुधवारी (दि.१९) दुपारी आगमन झाले. बुधवारी दुपारी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीसमवेत पंढरपूरला जाणाºया वारकºयांचे पंचवटीत गणेशवाडी येथे आगमन झाले. या ठिकाणी वारकºयांच्या निवासी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्र वारकºयांनी भजन किर्तनात घालवली.