आऊटसोर्सिंग ठेकेदाराला मनपाची क्लीन चीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:31+5:302020-12-12T04:31:31+5:30

स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. ११) या बैठकीत झालेल्या बैठकीत ही माहिती घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. ...

Corporation's clean chit to outsourcing contractor! | आऊटसोर्सिंग ठेकेदाराला मनपाची क्लीन चीट!

आऊटसोर्सिंग ठेकेदाराला मनपाची क्लीन चीट!

Next

स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. ११) या बैठकीत झालेल्या बैठकीत ही माहिती घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. दरम्यान, याचवेळी मनसेचे अशोक मुर्तडकर यांनी ठेकेदाराबरोबर कोणकोण पार्टनर आहेत ते सांगा, असा प्रश्न केला. डॉ. कुटे यांनी त्याबाबत आपणास माहिती नसल्याचे सांगितले तरी त्यामुळे नगरसेवकांच्या पार्टनरशीपविषयी उलटसुलट चर्चा रंगली होती.

नाशिक महापालिकेने दोन विभागात हा ठेका दिला असून, त्यात ७०० कामगार काम करीत आहेत; मात्र ठेकेदाराने उमेदवार भरताना त्यांच्याकडून १५ हजार रुपये अनामत रक्कम घेतली तसेच या कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात असले तरी एटीएमव्दारे त्यातून काही रक्कम काढून घेतली जाते, असा आरोप करण्यात येत होता. भाजपचे कमलेश बोडके यांनीही यांसदर्भात प्रश्न उपस्थित केलेच; परंतु यापूर्वी सभापती गणेश गीते यांनीदेखील प्रश्न उपस्थित केले होते; मात्र त्यावर डॉ. कुटे यांनी प्रशासनाच्या वतीने सरप्राईज व्हिजीट करून तसेच काही कामगारांना उपायुक्त करुणा डहाळे यांच्या दालनात बेालवून विचारणा करून कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये वेतन मिळत असून, त्यांच्या एटीएममधूनही पैसे काढले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तर बोडके यांच्याकडे ज्या कामगारांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारी प्रतिज्ञापत्रकासह प्रशासनाला सादर कराव्या असे ठरविण्यात आले.

इन्फो...

सावरकर तरणतलावाच्या कामाविषयी चर्चा

टिळकवाडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळील महापालिकेच्या कामांविषयी राहुल दिवे आणि स्वाती भामरे यांनी प्रश्न उपस्थित केेले. येथील सुधारणांबरेाबरच शहरातील सर्वच तरणतलावांची डागडुजी करण्याचा आदेश शहर अभियंत्यांना देण्यात आला.

Web Title: Corporation's clean chit to outsourcing contractor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.