मनपाचा वनमहोत्सव यंदा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 09:21 PM2020-04-30T21:21:22+5:302020-04-30T23:24:14+5:30

नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने विविध विभागांची कामे सुरू होऊ लागलीअसली तरी शासनाच्या वनखात्याचा महत्त्वांकाक्षी उपक्रम मात्र यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेला यंदा वीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, लॉकडाउनमुळे निविदाप्रक्रिया रखडली असल्यानेयंदा वृक्षारोपणाची शक्यता कमीच आहे.

 Corporation's forest festival is in trouble this year | मनपाचा वनमहोत्सव यंदा अडचणीत

मनपाचा वनमहोत्सव यंदा अडचणीत

googlenewsNext

नाशिक : पावसाळा तोंडावर आल्याने विविध विभागांची कामे सुरू होऊ लागलीअसली तरी शासनाच्या वनखात्याचा महत्त्वांकाक्षी उपक्रम मात्र यंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेला यंदा वीस हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, लॉकडाउनमुळे निविदाप्रक्रिया रखडली असल्यानेयंदा वृक्षारोपणाची शक्यता कमीच आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण आणि उद्यानांवर विशेष भर दिला जात आहे. तसेच दोन वर्षांपासून शहरात देवराई संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यासाठी अभिनेता सयाजी शिंदे यांची मदत घेण्यात आली होती. बंद पडलेल्या पुष्पोत्सवासदेखील सुरुवात झाली आहे. याशिवाय यापूर्वीच्या सरकारातील वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी वनखात्यामार्फत वनमहोत्सवाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यातदेखील महापालिकेने उद्दिष्टपूर्तीपेक्षा जास्त रोपे लावून संवर्धन केले होते. उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांनी वनखात्याच्या सूचनेनुसार बांबू लागवडीवरदेखील भर दिला. विशेषत: नदीकाठी बांबू लागवड करण्यात आली होती. तसेच वनधन योजनेअंतर्गत शिवाजी उद्यानात झाडे लावण्यात आली होती. यंदा मनपाला २० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट वनखात्याने दिले. त्यानुसार महापालिकेने तयारी केली होती. मात्र, गेल्या लॉकडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्यांनतर सर्वच कामकाज ठप्प झाले. त्यामुळे वृक्षलागवडीसाठीची निविदा रखडली. आता निविदाप्रक्रिया राबविल्या तरी स्थायी समिती किंवा तत्सम प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. ती मिळणे कठीण आहे आणि ती मिळाली तरी खड्डे खोदणे आणि रोपे लावण्यासाठी मजूर लागणार असून ते उपलब्ध होणे कठीण आहे.
-----------
वृक्षछाटणीसाठी लवकरच काढणार निविदा
पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या वतीने विविध कामे करताना धोकादायक झाडे काढणे तसेच वीजतारा किंवा अन्य धोकादायक वृक्ष हटविण्याचे काम केले जाते. परंतु यंदा महावितरणने या कामाला हात घातला असला तरी महापालिकेचे काम रखडले आहे. महापालिकेच्या वतीने यंदा धोकादायक वृक्ष हटविण्यासाठी किंवा फांद्या तोडण्याचे काम विभागनिहाय देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी निविदा प्रक्रियाच अद्याप राबविली गेलेली नाही. तथापि, लवकरच निविदा मागवून हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले.

Web Title:  Corporation's forest festival is in trouble this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक