मनपाचा कनिष्ठ लिपिक लाच घेतांना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:14+5:302021-04-04T04:15:14+5:30
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. संजय वनारसीभाई पटेल असे लाचखोर मनपा लिपिकाचे नाव आहे. ...
लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. संजय वनारसीभाई पटेल असे लाचखोर मनपा लिपिकाचे नाव आहे.
नवीन नळ कनेक्शन देण्याच्या बदल्यात संशयित पटेल याने तक्रारदार महिलेकडे हजारो रुपयांची लाच मागितली होती. पटेल मनपा पंचवटी विभागीय कार्यालयात घरपट्टी पाणीपट्टी विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. सीतागुंफारोड परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला फ्लॅटसाठी पाण्याचे नळ कनेक्शनसाठी पटेलने ३५ हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी ६ हजार रुपये लगेचच स्वीकारले होते आणि उर्वरित १० हजार रुपयांची रक्कम शुक्रवारी सीतागुंफा समोर उदय प्लाझा इमारतीत पहिल्या मजल्यावर स्वीकारले. पटेल कडून पथकाने लाचेची १० हजार रुपयांची रोकड जप्त केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक उज्वल कुमार पाटील, नरेंद्र पवार, हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक प्रकाश डोंगरे, अजय गरुड, प्रणय इंगळे यांच्या पथकाने कारवाई केली. शनिवारी पटेलला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने पटेलची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.