मनपाच्या सहा वॉर रूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:34+5:302021-04-12T04:13:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : कोरोना संदर्भातील बेड तसेच अन्य सर्व सुविधांची माहिती नागरिकांना एकाच दूरध्वनीवर मिळावी ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
नाशिक : कोरोना संदर्भातील बेड तसेच अन्य सर्व सुविधांची माहिती नागरिकांना एकाच दूरध्वनीवर मिळावी यासाठी महापालिकेच्या वतीने सहाही विभागांत वॉररूम सुरू करण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टीमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी ही माहिती दिली.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांना अत्यावश्यक माहिती तातडीने मिळावी यासाठी चोवीस तास वॉररूम सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी नाशिक रोड, नवीन नाशिक, सातपूर या सहा विभागीय कार्यालयांत कोविड-१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आले आहेत.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो कमी करण्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांना कोरोनाबाबतची माहिती व सहकार्य, मदत मिळण्यासाठी दृष्टीने सर्व विभागांतील सर्व विभागीय कार्यालयांतर्गत कोविड-१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आले आहेत. या वॉररूममध्ये नागरिकांना सी बी आर एस सिस्टीम, कोरोना केअर सेंटर, होम क्वारंटाईन व लसीकरण आदींबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असून, ही वॉररूम २४x७ म्हणजे अहोरात्र चालणार आहेत.
नागरिकांनी विभागीय क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी केले आहे.
इन्फो
या आहेत वॉररूम
नाशिक पूर्व-
०२५३-२९४५२९५
नाशिक पश्चिम- ०२५३-२५७०४९३
पंचवटी- ०२५३-२५१३४९०
नाशिक रोड- ०२५३-२४६०२३४
सिडको-०२५३-२९४७२९५
सातपूर - ०२५३-२३५०३६७