नगरसेवकाने हटवला ‘तो’ कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:32 AM2017-10-26T00:32:04+5:302017-10-26T00:32:09+5:30
गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर फटाक्यांच्या स्टॉल्समुळे झालेला कचरा हटविण्यासाठी प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेवक प्रियंका घाटे यांनी पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छ केला. यावेळी सह्याद्री युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.
नाशिक : गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर फटाक्यांच्या स्टॉल्समुळे झालेला कचरा हटविण्यासाठी प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेवक प्रियंका घाटे यांनी पुढाकार घेतला आणि परिसर स्वच्छ केला. यावेळी सह्याद्री युवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. इदगाह मैदानावर महापालिकेने फटाक्यांच्या स्टॉल्सला परवानगी दिली होती. दिवाळी होऊन दोन दिवस उलटूनही मैदानावरील कचरा महापालिकेने उचलला नव्हता. त्यामुळे इदगाह मैदानावर अस्वच्छता निर्माण झाली होती. सदर प्रकाराची दखल घेत प्रभाग नगरसेवक प्रियंका घाटे यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने मैदानातील कचरा हटविण्याचे काम केले आणि परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत सह्याद्री युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन घाटे यांच्यासह रंगनाथ मिसाळ, महेंद्र भालेराव, राहुल काळे, राहुल घाटे, सचिन घोलप, विकी घाटे, अनिकेत गोसावी, संकेत घाटे तसेच मनपाचे स्वच्छता निरीक्षक अर्जुन खिल्लारे, मुकादम मकवाना आदी सहभागी झाले होते.