नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी स्वखर्चाने गाजर गवत काढण्यास सुरुवात केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 03:54 PM2020-11-22T15:54:13+5:302020-11-22T15:55:40+5:30

इंदिरानगर : महापालिकेच्या मोकळ्या जागेतील गाजर गवत कोण काढणार हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक तीस चे नगरसेवक ...

Corporator Dr. Deepali Kulkarni started removing carrot grass at her own cost | नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी स्वखर्चाने गाजर गवत काढण्यास सुरुवात केली

नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी स्वखर्चाने गाजर गवत काढण्यास सुरुवात केली

googlenewsNext
ठळक मुद्देमोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजवत वाढले आहे

इंदिरानगर : महापालिकेच्या मोकळ्या जागेतील गाजर गवत कोण काढणार हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक तीस चे नगरसेवक डॉ दीपाली कुलकर्णी यांनी स्वखर्चाने गाजर गवत काढण्यास सुरुवात केली आहे
दिवाळीचा सण सुरू झाल्याने पालिकेच्या मोकळ्या जागेतील गाजर गवत काढण्यासाठी उद्यान विभागाला सांगून सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे तसेच पूर्व प्रभाग सभेत प्रभागांमध्ये उद्यान व मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजवत वाढले आहे त्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते कारण की उद्यान विभाग आणि बांधकाम विभाग एकमेकांवर गाजर गवत काढण्याची जबाबदारी ढकलत असल्याने उद्यान व महापालिकेच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे त्यामुळे बालगोपाळांना खेळण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याची तक्रार प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक कुलकर्णी यांच्याकडे केली तातडीने याची दखल घेत महारुद्र कॉलनी अरुणोदय सोसायटी चिंतामणी कॉलनी सन्मित्र वसाहत परब नगर येथील स्वामी समर्थ मंदिर परिसर त्याठिकाणचे दोन कामगार लावून मशीनद्वारे गाजर गवत स्वखर्चाने नगरसेवक कुलकर्णी यांनी काढले आहे
चौकट : महापालिकेच्यावतीने गाजर गवत काढण्यात येत नसल्याने प्रभागाचे नगरसेवकांना स्वखर्चाने गाजरगवत काढावे लागत आहे तसेच महापालिकेच्यावतीने काही ठिकाणी तन नाशक मारून सुद्धा गाजर गवत जैसे तेच असल्याने तन नाशक वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
 

 

Web Title: Corporator Dr. Deepali Kulkarni started removing carrot grass at her own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.