नगरसेविकेचे प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:17+5:302021-03-16T04:15:17+5:30

सिन्नर: पाणी पुरवठ्याच्या बेकायदेशीर निविदा मंजूर करण्यासह ठेकेदाराला जादा आर्थिक फायदा मिळवून दिल्या जात असल्याची तक्रार करीत नगरसेविका शीतल ...

Corporator fasting on the steps of the entrance | नगरसेविकेचे प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर उपोषण

नगरसेविकेचे प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर उपोषण

Next

सिन्नर: पाणी पुरवठ्याच्या बेकायदेशीर निविदा मंजूर करण्यासह ठेकेदाराला जादा आर्थिक फायदा मिळवून दिल्या जात असल्याची तक्रार करीत नगरसेविका शीतल कानडी यांनी सोमवारपासून परिषदेच्या पायऱ्यांवर उपोषणास प्रारंभ केला आहे. एकाही अधिकाऱ्याने या तक्रारीची दखल न घेतल्याने मंगळवार (दि. १६) पासून सहकारी नगरसेवकांना सोबत घेऊन साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती कानडी यांनी दिली.

२ डिसेंबर २०१९ रोजी पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा वितरण व्यवस्थाकामी तसेच योजनेची जलवाहिनी देखभाल व दुरुस्तीकामी नगर परिषदेकडून खुली निविदा मागविण्यात आली होती. त्यात काही अटी व शर्थी टाकण्यात आल्या होत्या; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार करीत नगरसेविका कानडी यांनी थेट नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर उपोषणास प्रारंभ केला आहे.

नगर परिषदेकडे प्राप्त सर्व ऑनलाइन निविदांच्या प्रति व संपूर्ण प्रक्रियेची माहिती तीन दिवसात द्यावी अन्यथा आपल्याला जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रार करावी लागेल, असे कानडी यांनी म्हटले आहे. त्यानंतरही आपल्याला न्याय न मिळाल्यास जनतेच्या पैशाची लूट थांबविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असे कानडी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कानडी यांच्या उपोषणस्थळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मेहमूद दारुवाला यांच्यासह सहकारी नगरसेवकांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

-------------------

आजपासून साखळी उपोषण

नगरसेवक शीतल कानडी यांनी नगर परिषदेच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केल्यानंतर मुख्याधिकारी किंवा पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती दिली नाही, त्यामुळे कानडी यांनी मंगळवारपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. या उपोषणात उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्यासह नगरसेवक सहभागी होणार असल्याची माहिती कानडी यांनी दिली.

----------------------

सिन्नर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर उपोषणास बसलेल्या नगरसेवक शीतल कानडी. समवेत माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बाळासाहेब उगले यांच्यासह नगरसेवक. (१५ सिन्नर नगरपालिका)

===Photopath===

150321\15nsk_26_15032021_13.jpg

===Caption===

१५ सिन्नर नगरपालिका

Web Title: Corporator fasting on the steps of the entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.