...नगरसेवक झाले संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:56 PM2017-10-22T23:56:37+5:302017-10-23T00:17:05+5:30

दिंडोरीरोडवरील रूपश्री अपार्टमेंटच्या बाहेरील रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून साचलेला कचरा उचलून न्यावा, अशी वारंवार विनवणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मनपाचे आरोग्य अधिकारी तसेच ठेकेदाराला बोलावून घेतले व कचरा उचलेपर्यंत घटनास्थळी थांबवून ठेवले होते. तब्बल दोन घंटागाडीभर कचरा जमा केल्यानंतर परिसर स्वच्छ झाला.

... the corporators became angry | ...नगरसेवक झाले संतप्त

...नगरसेवक झाले संतप्त

Next

पंचवटी : दिंडोरीरोडवरील रूपश्री अपार्टमेंटच्या बाहेरील रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून साचलेला कचरा उचलून न्यावा, अशी वारंवार विनवणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मनपाचे आरोग्य अधिकारी तसेच ठेकेदाराला बोलावून घेतले व कचरा उचलेपर्यंत घटनास्थळी थांबवून ठेवले होते. तब्बल दोन घंटागाडीभर कचरा जमा केल्यानंतर परिसर स्वच्छ झाला.  एकीकडे महापालिका केंद्र सरकारच्या आदेशावरून संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवित असताना दुसरीकडे मात्र एका भागात तब्बल दोन दोन महिन्यांपासून कचरा उचलला जात नसल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.  मनपा प्रभाग क्र मांक चारमधील दिंडोरीरोडवरील रूपश्री अपार्टमेंट बाहेरील रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून कचरा साचलेला होता. सदर कचरा न उचलल्याने दुर्गंधी पसरली होती. परिसरातील ब्लॅक स्पॉट असल्याबाबत मनपा प्रशासनाशी नगरसेवक जगदीश पाटील, शांता हिरे यांनी संपर्क साधला होता, मात्र तरीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या पाटील व हिरे यांनी मनपाचे आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. सुनील बुकाणे, संबंधित घंटागाडी ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून घेतले व रस्त्यावर साचलेला कचरा दाखविला त्यानंतर घंटागाडीत मनपा कर्मचारी कचरा उचलेपर्यंत थांबवून ठेवले होते.  परिसरात महिनाभरापासून कचरा उचलला नसल्याने कचरा सडलेला होता, तसेच ज्या ठिकाणी कचरा पडून होता तो परिसर पूर्णपणे काळसर पडला होता व मनपा कर्मचारी कचरा उचलत असताना त्या जागेवरून वाफा निघत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: ... the corporators became angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.