‘त्या’ नगरसेवकाची दानवेंकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:26 AM2018-04-24T00:26:42+5:302018-04-24T00:26:42+5:30
येथील भाजपा नगरसेवकांच्या गाड्यांची मोडतोड करणारा भाजपातील माजी नगरसेवक यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक सतीश सोनवणे व नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिले असून, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिल्याचे समजते.
इंदिरानगर : येथील भाजपा नगरसेवकांच्या गाड्यांची मोडतोड करणारा भाजपातील माजी नगरसेवक यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक सतीश सोनवणे व नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिले असून, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिल्याचे समजते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री काही टवाळखोरांनी दुचाकीवरून येऊन नगरसेवक सतीश सोनवणे व डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या गाड्यांची मोडतोड केली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. यात चौघा जणांचा सहभाग असल्याचे पहिल्या दिवशीपासूनच ाोलिसांना लक्षात आले होते. त्यानुसार पोलिसांनी दोनच दिवसांत यातील दोघा अल्पवयींनांसह एकास ताब्यात घेतले होते. मात्र यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी वाढतच असल्याने पोलिसांनी काही तासांतच यातील मुख्य संशयित प्रितम गोडसे ऊर्फ डॅनी यास ताब्यात घेतले होते. डॅनी याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हे काम करण्याची सुपारी नगरसेवक सुप्रिया खोडे यांचे पती माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी दिली असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी खोडे यांचा तपास सुरू केल्याचे समजातच खोडे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी खोडे यांनी विकासकामांच्या कामावरून हा गुन्हा केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे या प्रकाराला श्रेयवादाची लढाई म्हणून बघितले जाऊ लागले. यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही याबाबत कोणतीही पावले न उचलल्यामुळे अखेरीस आज नगरसेवक सोनवणे व कुलकर्णी यांनी नाशिक दौºयावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन व सर्व दैनिकांतील बातम्यांचे कात्रण तसेच सोशल मीडियावरील संदेशांबाबत माहिती दिली. खोडे यांच्यावर कारवाई न केल्यास भविष्यात इंदिरानगरमधून पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे खोडे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकाराने पक्षाची बदनामी होत असल्याचेही सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी उपस्थित होते. इंदिरानगरमध्ये भाजपातीलच माजी नगरसेवकाने भाजपाच्याच नगरसेवकांच्या गाड्यांवर हल्ला केल्यानंतरही पक्षातील स्थानिक पदाधिकायांनी कोणतीही कारवाई न केल्याने आज या दोन्ही नगरसेवकांनी थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. आता प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात या प्रकरणाचा चेंडू असून, ते यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.