नगरसेवकांचेच अतिक्रमण अहवाल मागविला

By admin | Published: May 15, 2015 12:19 AM2015-05-15T00:19:27+5:302015-05-15T00:19:52+5:30

नगरसेवकांचेच अतिक्रमण अहवाल मागविला

The corporators have asked for encroachment report | नगरसेवकांचेच अतिक्रमण अहवाल मागविला

नगरसेवकांचेच अतिक्रमण अहवाल मागविला

Next

  नाशिक : पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याबाबतची कार्यवाही प्रलंबित असतानाच अलीकडे करण्यात आलेल्या पाहणीत त्र्यंबकेश्वर नगरपरिषद हद्दीत असलेल्या एक हजाराहून अधिक अतिक्रमणांमध्ये अकरा नगरसेवकांचेच अतिक्रमण असल्याचे उघडकीस आल्याने त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला असून, यात नगरसेवकांचे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबई महापालिकेत दाखल असलेल्या एका याचिकेचा आधार घेऊन जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला असून, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण दूर केल्यास कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे अधिक सोपे होणार असल्याचा त्यामागचा हेतू आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देऊन दोन दिवसांपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्र्यंबक नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार शहरात १०५० कच्चे व पक्केस्वरूपाचे अतिक्रमण असून, त्यात सर्वपक्षीय अकरा नगरसेवकांनीच अतिक्रमण केल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात धनंजय तुंगार, माधुरी जोशी, लढ्ढा, रवींद्र सोनवणे, शिरसाठ, अडसरे आदिंचा समावेश आहे. या सर्वांचे अतिक्रमण या मोहिमेत काढण्यात येणार असून, त्र्यंबक शहरात अतिक्रमण नाही असा अहवाल नगरपरिषदेने सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: The corporators have asked for encroachment report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.