नगरसेवकाचे जलकुंभावर ‘शोले’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:51 PM2020-12-07T12:51:19+5:302020-12-07T12:52:05+5:30

अश्विन नगर, मोरवाडी परिसर ,पाथर्डी फाटा परिसर धनगर, दौलत नगरचा परिसर यासह प्रभागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपु-या स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे.

Corporator's 'Shole' movement on Jalkumbh | नगरसेवकाचे जलकुंभावर ‘शोले’ आंदोलन

नगरसेवकाचे जलकुंभावर ‘शोले’ आंदोलन

Next

नाशिक : महापालिकेच्या सिडको प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना महिला नगरसेवक किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी पाथर्डी फाटा येथील जलकुंभ वर उभे राहून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास जलकुंभ वरून उडी मारण्याचा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला आहे

सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मधील अश्विन नगर, मोरवाडी परिसर ,पाथर्डी फाटा परिसर धनगर, दौलत नगरचा परिसर यासह प्रभागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपु-या स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरसेवक किरण दराडे यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाºयांनी महापौरांचे नाव पुढे करून त्यांनीच पाणी पुरवठा वळविण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणी पुरवठा होत आहे . महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या सिडको विभागाचे उपअभियंता गोकुळ पगारे यांना दमदाटी करीत पाणी सिडकोकडून इंदिरानगर भागात वळविल्याचा आरोप नगरसेवक दराडे यांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थ त्यांनी सकाळी जलकुंभावरच धाव घेत आंदोलनाला सुरूवात केली.

Web Title: Corporator's 'Shole' movement on Jalkumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.